Home देश जनता परिवाराचे विलिनीकरण उद्या ?

जनता परिवाराचे विलिनीकरण उद्या ?

1

सहा पक्षांचे विलीनीकरण करुन, नव्या जनता परिवाराच्या स्थापनेची घोषणा उद्या बुधवारी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – सहा पक्षांचे विलिनीकरण करुन, नव्या जनता परिवाराच्या स्थापनेची घोषणा उद्या बुधवारी होण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या हाती जनता परिवाराचे नेतृत्व रहाण्याची शक्यता आहे.

यावर्षाच्या अखेरीस होणारी बिहार विधानसभेची निवडणूक आणि २०१७ मध्ये होणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुक डोळयासमोर ठेऊन या सहा पक्षांची जनता परिवाराच्या छत्राखाली एकत्र येण्याची योजना आहे.

मुलायमसिंह यादव य़ांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर नव्या पक्षाच्या नावाची औपचारिक घोषणा होऊ शकते. जेडीयू, जेडीएस, राजद, आयएनएलडी आणि सपा हे पक्ष जनता परिवारात आहेत. समाजवादी पक्ष सर्वात मोठा असल्याने, समाजवादी जनता पार्टी किंवा समाजवादी जनता दल असे नव्या पक्षाचे नाव असू शकते तसेच समाजवादी पक्षाचे सायकल हे निवडणूक चिन्ह नव्या पक्षाचे चिन्ह म्हणून स्वीकारले जाऊ शकते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयू प्रमुख शरद यादव, जेडीएसचे प्रमुख माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी जनता पार्टीचे प्रमुख कमाल मोरारका आणि आयएनएलडीचे नेते दुष्यंत चौटाला आणि सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत.

देशातील सद्य राजकीय स्थिती आणि उत्तरप्रेदश व बिहारमध्ये भाजपाचा वाढचा मतटक्का रोखण्यासाठी हे पक्ष एकत्र येत आहेत. नितीश कुमार यांनी या महाआघाडीसाठी विशेष पुढाकार घेतला होता.

1 COMMENT

  1. मोदींचे आभार मानायला पाहिजे.भारतातल्या भारतीय राजकारण करणाऱ्यांना अक्कल आली. परिवर्तन संसार का नियम हें/ 65 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीयांना निवडणूक लढवता येणार नाही.असा अध्यादेश राष्ट्र पतींच्या सहीने मोदीने काढला तर आपले काय होईल या भीतीने sarv mhatare yektra yet ahet. anadachi gost ahe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version