Home टॉप स्टोरी लोकप्रतिनिधी मवाली आहेत काय?

लोकप्रतिनिधी मवाली आहेत काय?

1

विधिमंडळातील आमदारांवर गेली दोन दिवस केलेल्या चिखलफेकीला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिले.

मुंबई- पोलिस अधिका-याला झालेल्या मारहाणीचे भांडवल करत प्रसारमाध्यमांनी विधिमंडळातील आमदारांवर गेली दोन दिवस केलेल्या चिखलफेकीला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिले. ‘‘लाखो लोकांमधून आमदार निवडून येतात. ते चोर, दरोडेखोर, मवाली आहेत काय, त्यांना असे म्हणणा-या निखिल वागळे यांना पाच मते तरी पडतील काय,’’ असा सवाल राणे यांनी केला. ‘‘पोलिसाला मारहाण झाल्याबद्दल आमदारांवर कारवाई झाली, पण त्यापूर्वी घडलेल्या घटनांवर कधी कारवाई करणार? विधिमंडळाचा पास असल्याशिवाय कुणालाही विधान भवनाच्या आवारात प्रवेश करता येत नाही. मात्र या वास्तूमध्ये बेकायदा प्रवेश करणा-यांवर कधी कारवाई करणार,’’ असा सवाल राणे यांनी केला. सर्वपक्षीय आमदारांच्या मनात खदखदणा-या असंतोषाला त्यांनी विधानसभेत वाचा फोडल्याने सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदार बाके वाजवून त्यांना जबरस्त पाठिंबा दिला.

विधान भवनाच्या आवारात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण झाल्याप्रकरणी बुधवारी पाच आमदारांना निलंबित करण्यात आले, तेव्हा अनेक आमदारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. मारहाणप्रकरणी आमदारांचे निलंबन झाले, पण ज्या पोलिस अधिका-याने उद्धट वर्तन केले, बेकायदा प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केला, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सायंकाळी निलंबित आमदारांना अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस विधान भवनात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आमदारांना गुंड, मवाली, राडेबाज अशी शेलकी विशेषणे लावली. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या मनात असंतोष खदखदत होता. उद्योगमंत्री नारायण राणे गुरुवारी सभागृहात आले आणि त्यांनी या खदखदणा-या असंतोषाला वाट करून दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच नारायण राणे यांनी आमदारांच्या होत असलेल्या बदनामीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. गेली दोन दिवस वृत्तवाहिन्यांवर आमदारांना चोर-मवाली बोलले जात आहे. या सदनाचे काही पावित्र्य आहे की नाही? सदस्यांना काही मान आहे की नाही, असा सवाल करून राणे यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

[EPSB]

बेधडक भिडणारा एकच वाघ, नारायण राणे! »

पोलिस अधिका-याला मारहाण झाल्याच्या कारणावरून ‘सळो की पळो’ अशी अवस्था झालेल्या आमदारांच्या मदतीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सरसावले.

[/EPSB]

निलंबित आमदारांना अटक करण्यासाठी विधान भवनात घुसलेल्या पोलिसांच्या कृत्याचा आणि सचिन सूर्यवंशीच्या उद्धटपणाचा राणे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘‘विधान भवनात जे घडले, त्याचे मी समर्थन करणार नाही. मात्र त्या आमदारांवर कारवाई होते आणि त्याच्या अगोदर घडलेल्या घटनेचे काय? आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी उद्धटपणे वागणा-या पोलिस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्यावर कारवाई का झाली नाही? दंडाची पावती फाडल्यानंतरही ठाकूर यांच्याशी त्यांनी जे वर्तन केले, त्याचे काय? विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधान भवनाच्या आवारात कुणावरही कारवाई करता येत नाही, विधिमंडळाचा पास असल्याशिवाय कुणीही या आवारात प्रवेश करू शकत नाही. मग गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी विधान भवनात आलेच कसे? त्याचाही फैसला झाला पाहिजे, असे नारायण राणे यांनी रोखठोक सांगताच दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

1 COMMENT

  1. याला म्हणतात मराठी बाणा,याला म्हणतात मित्रधर्म,याला म्हणतात शासकीय अभ्यास,याला म्हणतात रोकठोक विचार,म्हणूनच याला म्हणतात कोकणचा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version