Home महाराष्ट्र जेजुरीत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे आंदोलन

जेजुरीत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे आंदोलन

1

पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपालिकेने अपंगांसाठी असणा-या निधीची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये तरतूद करूनही त्यावर कोणताही खर्च केलेला नाही, तसेच याबाबत विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

जेजुरी- पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपालिकेने अपंगांसाठी असणा-या निधीची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये तरतूद करूनही त्यावर कोणताही खर्च केलेला नाही, तसेच याबाबत विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेकडो अपंगांच्या उपस्थितीत यावेळी जेजुरी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

या वेळी जेजुरी नगराध्यक्षा साधनाताई दरेकर यांनी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सुरेखा ढवळे यांचे निवेदन स्वीकारून यावर लवकरच निर्णय घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी स्वीकृत नगरसेवक हेमंत सोनावणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे माजी सदस्य सुनील असवलीकर उपस्थित होते.

कायद्याप्रमाणे अपंगांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्याची तरतूद आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो अपंग सामील झाले होते, आम्ही शरीराने अपंग असून मनाने खंबीर आहोत, आम्हाला न्याय द्या, असे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. येणा-या काळात लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version