Home विदेश ज्युलियन असांजच्या बाजुने राष्ट्रसंघाचा निकाल

ज्युलियन असांजच्या बाजुने राष्ट्रसंघाचा निकाल

0

लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली विकिलीक्स संस्थेचे संस्थापक ज्युलियन असांज यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने असांज त्यांच्या बाजुने निकाल दिला. 

न्यूयॉर्क- लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली विकिलीक्स संस्थेचे संस्थापक ज्युलियन असांज यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने असांज त्यांच्या बाजुने निकाल दिला.

लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर असांज यांना स्विडीश सरकारकडे हस्तांतरीत करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे असांज यांनी २०१२मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासामध्ये राजकीय आश्रय मागितला होता. मात्र २०१४ मध्ये असांज यांनी आपल्याला अटक न करता केवळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याची आल्याची तक्रार राष्ट्रसंघाकडे केली होती.

या प्रकरणी विरुद्ध निकाल लागल्यास ब्रिटीश पोलिसांकडून अटक करवून घेण्याची तयारीही असांज यांनी दर्शवली होती. असांज शुक्रवारी इक्वेडोरचा दूतावास सोडणार आहेत.

लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपांतर्गत असांज स्वीडनला हवा आहे. मात्र हजारो संवेदनशील राजनतिक व लष्करी कागदपत्रे उघड करणा-या असांजला स्वीडनकरवी अमेरिकेच्या स्वाधीन केले जाण्याची भीती आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version