Home महाराष्ट्र ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे निधन

1

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

पुणे- ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

मंगळवारी सकाळी दहा वाजता सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात लक्ष्मण यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुस आणि किडनीचा त्रास होत होता. गेल्या नऊ दिवसांपासून लक्ष्मण यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. त्यांनी १९५०पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले.

त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नाही. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४मध्ये गौरवण्यात आले.

कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. त्यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, रेमनमॅगॅसेसे आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले.

संबंधित बातम्या…

आर. के. लक्ष्मण यांनी साकारला ‘कॉमन मॅन’!

नाबाद १००कडे झेपावत आहे ‘कॉमन मॅन’

‘कॉमनमॅन’चा बाप

‘कॉमन मॅन’चा ‘भारतरत्न’ने सन्मान व्हावा

आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके

आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)

पुरस्कार

लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांत पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्कार, मराठा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार

आत्मचरित्र

आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.

1 COMMENT

  1. न भूतो ! न भविशन्ति ! आर . के . लक्ष्मण .यांचे सारखा व्यंग चित्रकार पुन्हा होणे नाही ,
    ” परमेश्वर मृतात्म्यास सद्गती देओ “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version