Home महामुंबई ‘झालाच पाहिजे!’ आजपासून रंगमंचावर

‘झालाच पाहिजे!’ आजपासून रंगमंचावर

2

बेळगावमधील मराठी माणसांवर होणा-या अत्याचारावर प्रकाश टाकणारे ‘झालाच पाहिजे!’ हे नाटक आज रंगभूमीवर येत आहे.

मुंबई- बेळगावमधील मराठी माणसांवर होणा-या अत्याचारावर प्रकाश टाकणारे ‘झालाच पाहिजे!’ हे नाटक आज रंगभूमीवर येत आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात दुपारी तीन वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होईल. ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली

‘महाराष्ट्र कलानिधी’ व अनंत पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन प्रदीप राणे व संतोष पवार यांनी तर दिग्दर्शन विजय केंकरे व संतोष पवार या द्वयींनी केले आहे.

[EPSB]

‘झालाच पाहिजे’ला कन्नडिगांचा विरोध

बेळगावातील मराठी जनतेच्या गळचेपीसंदर्भात भाष्य करणा-या ‘झालाच पाहिजे’ या नाटकाला कानडी भाषकांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे.

‘झालाच पाहिजे’मुळे सीमाप्रश्न सगळ्यांपर्यंत पोहोचेल!

‘सीमाभागात जो प्रकार चालू आहे तो घृणास्पद आहे. आपण जोपर्यंत भोगत नाही, तिथे राहत नाही, तोपर्यंत आपण तिथला विचार करत नाही, ही आपली वृत्तीच आहे.

सीमाप्रश्नाचा हुंकार रंगमंचावर

मराठीबहुल बेळगाव, कारवार, निपाणी इथल्या सीमावासीयांच्या लढ्याचा वेध घेणारे ‘झालाच पाहिजे’ या नावाचे नाटक एक मे रोजी रंगभूमीवर येणार आहे.

[/EPSB]

2 COMMENTS

  1. एकंदरीत कार्यक्रमाला उशीर झालाच होता . नितेश राणे यांचा स्वाभिमान किमान एक मिनिटात
    लोकांपर्यंत पोहोच्न्याची नामी संधि घालवून टाकली। बेलगाम सिरिअस विषयात थोडासा विनोद मान्य आहे
    . . पण व्रर्तमान राजकीय विनोद कमी आणि मुख्य विषयाबद्दल खरोखरीच ज्वलंत विचार आणि शाहिरांचे
    पोवाडे आवश्यक व अपेक्षित अहेत. आशय सुरुवातीस बदल झालाच पाहिजे . ठाणे , पुणे , नाशिक येथे तरी हे सुधारण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version