Home महामुंबई झोपडीवासीयांच्या समस्या सोडवण्यात प्राधिकरण अपयशी

झोपडीवासीयांच्या समस्या सोडवण्यात प्राधिकरण अपयशी

1

 ‘मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’त मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असून झोपडीवासीयांच्या समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरत आहेत, असे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी लोकसभा सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबई – ‘मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’त मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असून झोपडीवासीयांच्या समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरत आहेत, असे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी लोकसभा सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणा-या या चर्चेत सहभाग घेताना डॉ. राणे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात होत असणा-या गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी सभागृहाला केली.

मुंबईत राहणा-या झोपडीवासीयांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना १९९५मध्ये करण्यात आली होती. या प्राधिकरणाचा मुख्य उद्देश हा झोपडपट्टीत राहणा-यांचे पुनर्वसन करून त्यांना त्यांच्या झोपडीची पुनर्बाधणी करून देणे हा होता. मात्र गेल्या १७ वर्षात मुंबईत राहणा-या ८६ लाख रहिवाशांना त्यांची हक्काची घरे देण्यास या प्राधिकरणाला अपयश आल्याचे डॉ. राणे यांनी या वेळी सांगितले.

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास ८ वर्षापूर्वी मान्यता मिळाली असून, त्याचे नियोजन करण्यात प्राधिकरणाचे सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. असे असूनही ५ कार्यक्षेत्रांमध्ये होणा-या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई विमानतळाजवळ असणा-या झोपडपट्टी परिसरात ८५ हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. गेल्या ७ वर्षात केवळ ११ हजार कुटुंबांना पुनर्वसनाद्वारे घरे बांधून मिळाली, तर १८ हजार घरांचे बांधकाम विकासकामार्फत सुरू आहे. आतापर्यंत केवळ १५ टक्के झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन झाले.

२७६ एकर परिसरात असणारा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात होत असणाऱ्या गैरप्रकारांना व अनियमिततेबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात होणा-या गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करण्यात यावी व त्यातील अनियमितता दूर करावी, असे आवाहन या चर्चेदरम्यान खासदार डॉ. राणे यांनी सरकारकडे केले आहे.

1 COMMENT

  1. zopadpattila bhet deun tyacya mulbut sanmsya sanga.
    1)tyaci prasthavna.
    2)udiste.
    3)sanbhandit sahityaca abhyas.
    4)tyace mahttv.
    5)vaparleli padhat.
    6)sucvleli padhat.
    plz-reply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version