Home क्रीडा टी२० विश्वचषक – हॉलंडचा मुख्य फेरीत प्रवेश

टी२० विश्वचषक – हॉलंडचा मुख्य फेरीत प्रवेश

1

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत हॉलंडने आर्यलंडचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. 

सिल्हेत – आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत हॉलंडने आर्यंलडचा सहा गडी राखून पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. आर्यलंडने ठेवलेल्या १८९ या भरभक्कम धावसंख्येचे आव्हान हॉलंडने ३७ चेंडू राखून सहज पार केले. 

त्याआधी हॉलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पॉईंटर याचे दमदार अर्धशतक त्याचबरोबर पॉर्टरफिल्डच्या ४७ आणि ओरियनच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर आर्यलंडला १८९ इतकी मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. हॉलंडच्या जमिलने सर्वाधिक दोन गडी बाद केले. 

आर्यलंडच्या इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हॉलंडकडूनही दमदार  सुरुवात झाली.  पहिल्या विकेटसाठी मेबर्ग आणि बोरेन या जोडीने सर्वाधिक ९१ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर कूपर आणि बरेसी यांच्या चौथ्या विकेटसाठीच्या ६१ धावांच्या भागीदारीचाही हॉलंडच्या विजयात मोठा वाटा आहे. 

या विजयासोबतच हॉलंडने मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.  याआधी बांगलादेशनेही मुख्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

संक्षिप्त धावफलक

आर्यलंड – चार बाद २८९

हॉलंड – चार बाद १९३

सामनावीर – एस जे मेबर्ग(हॉलंड)

1 COMMENT

Leave a Reply to om chalke Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version