Home मध्यंतर वास्तू वेध टेबलावरचं इलेक्ट्रिकल वर्क

टेबलावरचं इलेक्ट्रिकल वर्क

1

गेल्या भागाच्या शेवटी आपण कॉन्फरन्समधल्या प्रोजेक्टर सिस्टिमबद्दल चर्चा केली, मात्र या सर्व वायर आणि पर्यायाने या सर्व साधनसामग्रीचे कंट्रोल त्या कॉन्फरन्स टेबलवर कसे येतील याची व्यवस्था करणं फार आवश्यक असतं. सगळे कंट्रोल टेबलवर येतात तेव्हा अर्थातच या सगळ्या वायर्स आणि डाटा केबल्स या टेबलवर येणं आवश्यक असतं.  पण त्या कशा आणल्या जातात हे आज आपण जाणून घेऊ या.

मागील दोन भागांत सुरू केलेला हा इलेक्ट्रिकल वर्कचा प्रवास आज अंतिम टप्प्यांत आलेला आहे. नेहमीप्रमाणे ईमेल आणि फेसबुकद्वारे मला प्रोत्साहन देणा-या प्रहारच्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. गेल्या लेखासाठी मला खरं तर दोन भिन्न अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी सांगितलं की काही संज्ञा(टर्म्स)या फारच तांत्रिक होत आहेत तर काहींनी त्यासाठीच कौतुक केलं.

खरं तर या दोन्हींचा सुवर्णमध्य साधायचा नेहमीच प्रयत्न असतो. कारण एखादी किचकट मात्र तेवढीच इन्फोर्मेटिव्ह गोष्ट सोप्या भाषेत समजावली तर ती लगेच मनाला भिडते आणि जास्त काळ स्मरणातदेखील राहते. त्यामुळे अशा या सोप्या भाषेत जमेल तेवढया टेक्निकल गोष्टींकडे प्रकाश टाकायचं काम मी जरूर करत राहीन. कारण आपल्याला आवडणा-या, समजणा-या भाषेत इंटिरिअरच्या विश्वातल्या घडामोडी हाच मुळात ‘माझी घरंदाजी’ या लेखमालिेकचा मूळ उद्देश आहे.

गेल्या भागाच्या शेवटी आपण कॉन्फरन्समधल्या प्रोजेक्टर सिस्टिमबद्दल चर्चा केली. मात्र या सर्व वायर आणि पर्यायाने या सर्व साधनसामग्रीचे कंट्रोल त्या कॉन्फरन्स टेबलवर कसे येतील याची व्यवस्था करणं फार आवश्यक असतं. कारण कोणत्याही ऑफिसमधलं कॉन्फरन्स टेबल हे शक्यतो रूमच्या मध्यावर असतं.

मग तिथपर्यंत या वायर्स आणि कंट्रोल कसे पोहोचणार? यासाठी मुळात आपण कॉन्फरन्स टेबल डिझाईन करताना किंवा जर ते मॉडय़ुलर म्हणजेच रेडिमेड असेल तर ते निवड करताना त्याची वायर मॅनेजमेंट कशी आहे किंवा आपल्याला कशी हवी आहे हे ठरवणं आवश्यक असतं. म्हणजे सगळे कंट्रोल टेबलवर येतात तेव्हा अर्थातच या सगळ्या वायर्स आणि डाटा केबल्स या टेबलवर येणं आवश्यक असतं.

भिंतीवरून उतरून त्या केबल्स फ्लोअर ट्रंकिंगद्वारे टेबलच्या बरोबर खालच्या भागात असतात. या फ्लोअर ट्रंकिंगबद्दल आपण पुढे चर्चा करूच. तर या केबल्सवर टेबलवर येण्यासाठी मुख्यत्वे दोन पर्याय असतात.

एक तर त्या टेबलचे जे पाय असतात ते पोकळ असले म्हणजे मग त्यातून या वायर्स सहज पास होतात आणि वर टेबलवर पोहोचतात.

दुसरा पर्याय म्हणजे स्पाईन कॉर्ड किंवा स्नेक कॉर्ड. या स्पाईन किंवा स्नेक अशासाठी म्हणतात कारण मुळात हा मणक्याच्या आकारासारखा एक पाईप असतो. हा फ्लेक्झिबल असल्याने कधी कधी सापासारखासुद्धा दिसतो. म्हणून याला स्नेक कॉर्ड असंदेखील म्हणतात. हा पाईप साधारण २ रे २.५ इंच व्यासाचा असतो. ज्यातून साधारण या सर्व वायर्स पास होतात.

या कॉर्डचा एकच फायदा म्हणजे केबल हे एका जागी फिक्स न करता, समजा कॉन्फरन्सरूममध्ये टेबल एका बाजूला करून जर एखादी अ‍ॅक्टिव्हिटी असेल तर ती करायला वाव मिळतो. मात्र जर टेबलच्या पायामधून वायर जाणार असतील तर मात्र टेबल हे फिक्स राहतं आणि ही सुलभता किंवा फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मिळत नाही.

एकदा वायर्स वर आल्या की टेबलच्या खाली एक केबल ट्रे लावून अख्ख्या टेबलच्या लांबीवर त्या फिरवता येतात. आणि मग जेवढे सीटर केबल असेल त्या प्रमाणात टेबलवर पॉइंट्स घेतले जातात. उदा. समजा सहा सीटर टेबल असेल तर साधारणपणे तीन पॉइंट्स देण्यात येतात. म्हणजे तीन लोकेशनवर हे यूपीएस/रो/ डाटा पॉइंट्स असतात. म्हणजे दर दोन माणसांगणिक एक पॉइंट.

अर्थात हे सर्व क्लायंटच्या गरजेवर अवलंबून असतं. कारण काही ठिकाणी अगदी सहा सीटर टेबल तर एकच पॉइंट देण्यात येतो. आता हे पॉइंट म्हणजे हे बॉक्सेस. थेट टेबलवर लावले तर दिसायला चांगले दिसत नाहीत म्हणून मग त्यासाठी फ्लिप टॉप बॉक्सचा पर्याय असतो. हे फ्लिप टॉप बॉक्स एखाद्या बॉक्ससारखेच असतात.

जे टेबलवर खाचा करून वरून बसवण्यात येतात आणि जेव्हा आपल्याला हे पॉइंट्स वापरायचे असतील, तेव्हा फक्त याची टॉप लिड म्हणजे झाकण उघडायचं आणि आतला पॉइंट वापरायचा. साधारणपणे या टॉपच्या लिडचं म्हणजे झाकणाचं फिनिश हे सिल्व्हर किंवा मॅट मेटलचं असतं. म्हणजे जरी टेबल बुडन फिनिश असेल तरी हे फ्लिप बॉक्सेस वरून मेटलच्या पॅचसारखे दिसतात.

हल्ली आपण यावर कस्टम मेडसुद्धा फिनिश करून घेऊ शकतो. म्हणजे ज्या शेडचं आपलं टेबल आहे त्याच सेम शेडमध्ये हे टॉप फिनिश करून मिळतात. त्यामुळे मग वेगळे पॅच असे त्या टेबलवर दिसत नाहीत.

आता आपल्याला आवर्जून उल्लेख करायला लागेल तो म्हणजे मी मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे ऑफिसच्या धमण्यांचा म्हणजेच फ्लोअर ट्रंकिंगचा. जेव्हा एखाद्या ऑफिसचं काम सुरू होतं, तेव्हाच फर्निचर लेआऊटप्रमाणे फ्लोअर ट्रंकिंगचं डिझाईन होणं महत्त्वाचं असतं. म्हणजे फ्लोअरिंगमध्येच हे ट्रंकिंग आपल्याला इंटिग्रेट करता येतं. हे ट्रंकिंग म्हणजे कन्सिल्ड वायरिंग असतं.

अ‍ॅल्युमिनिअमच्या चपटया चॅनेल्समधून या वायर वाहून नेल्या जातात आणि आपल्याला गंतव्य स्थळी म्हणजे एंड यूझर पॉइंट्सवर पोहोचतात. या ट्रंकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे इलेक्ट्रिकल वायर्स आणि डाटा केबल यांचं वर्गीकरण. डाटा सप्लाय आणि इलेक्ट्रिकल सप्लाय हा कधीच एकाच ट्रंकिंगमधून होत नाही. त्यासाठी दोन वेगवेगळ्या ट्रंकिंग असतात.

एवढंच नव्हे तर या दोन ट्रंकिंगमध्येसुद्धा किमान ६ इंच म्हणजे १५० मिमीची असणं आवश्यक असतं. नाहीतर इलेक्ट्रिकल सप्लायमुळे या डेटावर परिणाम होऊन त्याचा प्रवाह बंद होण्यातसुद्धा परिणिती होऊ शकते. हे ट्रंकिंग काही ठरावीक अंतरावर १० ७ १० इंच किंवा १२ ७१२ च्या जंक्शन बॉक्ससने जोडण्यात येतात. जेणेकरून जर वायरिंगमध्ये काही फॉल्ट असेल तर हे जंक्शन बॉक्सेस उघडून ते सॉल्व्ह करण्यात येतात.

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada , Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version