Home क्रीडा श्रीलंकेच्या मदतीला कर्णधार मॅथ्यूज

श्रीलंकेच्या मदतीला कर्णधार मॅथ्यूज

0

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरी आणि अंतिम कसोटी रंगतदार अवस्थेत आली आहे.

पल्लीकेली- श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरी आणि अंतिम कसोटी रंगतदार अवस्थेत आली आहे. पाकिस्तानला दुस-या डावात २१५ धावांत रोखताना श्रीलंकेने तिस-या दिवसअखेर रविवारी दुस-या डावात ५ बाद २२८ धावा केल्यात. पहिल्या डावातील ६३ धावांच्या आघाडीसह यजमानांनी एकूण आघाडी २९१ धावांवर नेली आहे.

पाकिस्तानवर आघाडी घेतल्याचा आनंद असला तरी राहत अली आणि एहसान अदिलने श्रीलंकेला हादरवले. पहिल्या डावातील शतकवीर दिमुथ करुणारत्नेला (१०) राहतने लवकर बाद केले. दुसरा सलामीवीर एहसान अदिलने कौशल सिल्वा (३) तसेच लहिरु थिरिमने (०) आल्यापावली परतल्याने यजमानांची अवस्था ३ बाद ३५ धावा अशी झाली.

मात्र कर्णधार मॅथ्यूजने २२वे अर्धशतक झळकावतानाच दोन अर्धशतकी भागीदा-या करताना श्रीलंकेला सुस्थितीत आणले. त्याने उपुल थरंगासह (४८) चौथ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या त्यानंतर जेहन मुबारकसह (३५) पाचव्या विकेटसाठी ८१ धावा आणि दिनेश चंडिमलसह (खेळत आहे ३९) सहाव्या विकेटसाठी नाबाद ६७ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेला दोनशेपार नेले.

मॅथ्यूजच्या (खेळत आहे ७७) झटपट नाबाद अर्धशतकात ६ चौकारांचा समावेश आहे. चंडिमलने पाच चौकार लगावलेत. वेगवान राहत अली आणि फिरकीपटू यासिर शाहने (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी मारा करताना यजमानांची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला तरी तीनशेपार आव्हान पाकिस्तानसाठी सोपे नसेल.

तत्पूर्वी, ९ बाद २०९ वरून पाकिस्तानचा पहिला डाव २१५ धावांवर संपला. सर्फराझ अहमद ७८ धावांवर नाबाद राहिला. वेगवान धम्मिका प्रसादसह नुवान प्रदीप आणि फिरकीपटू थरिंदू कौशलने प्रत्येकी तीन विकेट घेत श्रीलंकेला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – २७८ आणि ५ बाद २२८ (मॅथ्यूज नाबाद ७७, थरंगा ४८, चंडिमल नाबाद ३९, राहत अली ५८-२, यासिर शाह ७०-२) वि. पाकिस्तान – (९ बाद २०९ वरून) २१५ (अहमद नाबाद ७८, प्रदीप २९-३, कौशल ३७-३, प्रसाद ७८-३)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version