Home विदेश ट्युनिशियात सुरक्षा रक्षकांच्या बसमध्ये स्फोट

ट्युनिशियात सुरक्षा रक्षकांच्या बसमध्ये स्फोट

0

ट्युनिशियाचे अध्यक्ष बेजी केड इसेबसी यांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणा-या बसमध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या  स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला.

टय़ुनिस- ट्युनिशियाचे अध्यक्ष बेजी केड इसेबसी यांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणा-या बसमध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या  स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नसून या हल्ल्यामागे इसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर टय़ुनिशियात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली असून टय़ुनिश शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टय़ुनिशियाचे अध्यक्ष बेजी केड इसेबसी यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक बस स्थानकात थांबले असताना हा स्फोट झाला. मुसळधार पाऊस असल्याने या वेळी वाहतूक कमी होती. दहशतवाद्यांनी आधीच बसमध्ये बॉम्ब ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टय़ुनिशियातील सोसी येथील एका रेस्टॉरंटवर हल्ला केल्यानंतर टय़ुनिशियाने इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांना लक्ष केले होते. त्यामुळे हा हला इसिसनेच केला असल्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version