Home महामुंबई डाटा कॉपी करून नवी दिल्लीत खरेदी

डाटा कॉपी करून नवी दिल्लीत खरेदी

1

मरीन ड्राईव्ह येथे राहणा-या ७३ वर्षीय वृद्धेच्या क्रेडिट कार्डचा डाटा कॉपी करून बनावट क्रेडिट कार्डच्या सहाय्याने नवी दिल्लीतून सुमारे पावणेदोन लाख रुपयांची खरेदी केल्याची घटना पुढे आली आहे.

मुंबई- मरीन ड्राईव्ह येथे राहणा-या ७३ वर्षीय वृद्धेच्या क्रेडिट कार्डचा डाटा कॉपी करून बनावट क्रेडिट कार्डच्या सहाय्याने नवी दिल्लीतून सुमारे पावणेदोन लाख रुपयांची खरेदी केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चिंचलकर यांनी दिली. या प्रकरणी आरोपीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे.

नर्गिस मेस्त्री या मरीन ड्राईव्ह येथील मादाम कामा रोडवरील एअर इंडियाच्या कार्यालयाजवळीत इमारतीत वास्तव्याला आहेत. मेस्त्री या गेले अनेक वर्षापासून एका राष्ट्रीयीकृत बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असून नुकतेच त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डच्या साहाय्याने एक लाख ६७ हजार रुपयांची खरेदी केल्याचे चार एसएमएस मोबाइलवर आल्यामुळे त्याही आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी बँकेशी संपर्क साधला असता नवी दिल्लीतून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या साहाय्याने मॉल, ज्वेलर्सचे दुकान व पेट्रोल पंपावर खरेदी झाल्याचे त्यांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली.

प्राथमिक तपासानुसार, आरोपीने मॉलमध्ये एक लाखाची, एका प्रसिद्ध ज्वेलर्स व पेट्रोल पंपावर १० हजार रुपयांची खरेदी केली आहे. पेट्रोप पंपावर खरेदी करीत असताना तेथील कर्मचा-यांनी आरोपीकडून ओळखपत्राची मागणी केली असता त्याने नायक नावाचा चालक परवाना ओळखपत्र म्हणून सादर केला होता. याशिवाय मॉलमधील सीसीटीव्हीचे चित्रीकरणही पोलिसांच्या हाती लागले असून त्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. स्थानिक प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधून आरोपीने सादर केलेल्या चालक परवान्याच्या सत्यतेची पडताळणी करणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन पाटील यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version