Home क्रीडा दक्षिण आफ्रिकेच्या डेविलियर्सचा जलद शतकाचा विश्वविक्रम

दक्षिण आफ्रिकेच्या डेविलियर्सचा जलद शतकाचा विश्वविक्रम

1

एबी डेविलियर्सने रविवारी वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत जलद शतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.  

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डेविलियर्सने रविवारी वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत जलद शतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम आधी न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनच्या नावावर होता.

कोरी अँडरसनने मागच्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुध्द जलद शतकाचा विक्रम रचला होता. त्याने फक्त ३६ चेंडूत शतक झळकावले होते. डेविलियर्सने वेस्ट इंडिज विरुध्दच फक्त ३१ चेंडूत शतक झळकावून हा विक्रम मोडला. शतकाआधी डेविलियर्सने सनथ जयसूर्याच्या नावावर असलेला अर्धशतकाचाही विक्रम मोडला. त्याने फक्त १६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

डेविलियर्स अखेर शेवटच्या षटकात १४९ धावांवर रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. डेविलियर्सने आपल्या तडाखेबंद खेळीत नऊ चौकार आणि १६ षटकार लगावले.

वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला असून, वेस्ट इंडिजला विजयासाठी ४४० धावांचे आव्हान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर हाशिम आमला आणि ऱॉसाऊनेही शतक झळकावले. ऱॉसाऊने १२८ धावांची खेळी केली तर, आमला १५३ धावांवर नाबाद राहिला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version