Home क्रीडा ढोणी क्रिकेटमधला सदगृहस्थ – हॅडीन

ढोणी क्रिकेटमधला सदगृहस्थ – हॅडीन

1

कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करण्याच्या महेंद्रसिंह ढोणीच्या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार ब्रॅड हॅडीनलाही आश्चर्य वाटले आहे.

सिडनी – कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करण्याच्या महेंद्रसिंह ढोणीच्या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार ब्रॅड हॅडीनलाही आश्चर्य वाटले आहे.

ढोणीने भारतीय संघाची सूत्रे स्वीकारली त्यावेळपेक्षा भारतीय संघाला त्याने आता अधिक चांगल्या स्थितीत आणून ठेवले आहे. ढोणी हा क्रिकेटच्या खेळातला सदगृहस्थ आहे अशा शब्दात हॅडीनने ढोणीचे कौतुक केले.

ढोणीच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव. मैदानावर स्थिती कशीही असो ढोणीने कधीही स्वत:चे संतूलन ढळू दिले नाही. त्यामुळेच त्याने दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केले असे हॅडीनने म्हटले आहे.

ढोणीने भारतीय क्रिकेटची चांगली सेवा केली. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाचे मलाही आश्चर्य वाटले. त्याच्या विरुध्द खेळताना नेहमीच आनंद मिळाला. तो क्रिकेटमधला सदगृहस्थ आहे असे हॅडीनने सांगितले.

1 COMMENT

  1. धोनी हा भारताचा रत्न आहे खूप साय्यमाने क्रिकेट खेळला आणि त्याच्या निवृतीने मी खूप दुखी झालो आहे त्याचे निर्णय तर खूप विचार पूर्वक आहेत आणि तो भारताचा सर्वात लकी कर्णधार आहे पण तो आम्हाला हादरा देऊन गेला आहे तर त्यालआम्ही माप नाही करणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version