Home देश दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे

दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे

1

दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर दबाव वाढल्यानंतर हैदराबाद विद्यापीठाने चार विद्यार्थ्यांचे व १२ प्राध्यापकांचे निलंबन गुरुवारी मागे घेतले.

हैदराबाद – दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर दबाव वाढल्यानंतर हैदराबाद विद्यापीठाने चार विद्यार्थ्यांचे व १२ प्राध्यापकांचे निलंबन गुरुवारी मागे घेतले. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रय यांचे राजीनामे घ्यावेत व पंतप्रधान मोदींनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली.

दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच हैदराबाद विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची गुरुवारी तातडीची बैठक झाली. त्यात निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे ठरले. तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या १३ प्राध्यापकांना पुन्हा प्रशासकीय पदे देऊन त्यांना अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यायला हवा. विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, रोहित नसल्याने तो आनंद आम्ही साजरा करू शकत नाही. रोहितच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई, एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले की, सरकारने यापूर्वीच कारवाई केली असती तर रोहित वेमुला या विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली नसती. विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेऊन खोटारडेपणावर शिक्कामोर्तब केले.

[EPSB]

रोहित वेमुलाच्या बळीतून ‘किस का विकास?’

हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणावरून देशात मोठय़ा प्रमाणावर निषेधाचे सूर उमटले आहेत. भाजपा आणि संघप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या कारवाया आणि त्याला केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या जातीयवादी मानसिकतेची मिळलेली साथ याच्या परिणामाचा रोहित बळी ठरला.

रोहित वेम्युला आत्महत्येचे देशभरात तीव्र पडसाद

भारिप बहुजन महासंघाचे सचिव ज.वि. पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेटला दुपारी आंदोलन झाले. या आंदोलनात दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला

नरेंद्र मोदी देशाची माफी मागा

दलित विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेची झोड उठवली.

[/EPSB]

1 COMMENT

  1. भारताच्या इतिहासामध्ये जातीयवादी लोकांनी स्वताच्या तोंडाला अजून एकदा काळे फासून भारताला पुन्हा ५० वर्षे मागे नेले. आता पर्यंत समाजात जेवढ्या लोकांनी जातिवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो सगळा व्यर्थ गेल्या सारखे वाटले. पुन्हा बाबासाहेब आणि फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज सारख्या लोकांना जातिवाद गाडण्यासाठी जन्म घ्यावाच लागेल हेच सत्य !! आता फक्त उरले आणि तो शिवाजी किंवा आंबेडकर आजच्या पिढीचा अजून पावरफुल असेल यातही काही शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version