Home महामुंबई दहा लाखांचा हप्ता मागितल्याने दोन पोलीस निलंबित

दहा लाखांचा हप्ता मागितल्याने दोन पोलीस निलंबित

1

दहा लाख रुपयांची मागणी करून अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणा-या दोन पोलिसांना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

मुंबई- दहा लाख रुपयांची मागणी करून अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणा-या दोन पोलिसांना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत महादेव मेटे आणि विलेपाल्रे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास भास्कर हजारे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

एका व्यावसायिकाला खोटय़ा गुन्ह्यात अटकेची धमकी देऊन त्यांच्याकडे या दोघांनी पैशांची मागणी केली होती.

प्राथमिक तपासात त्यात तथ्य असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी ही कारवाई करताना त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांना दिल्याचे समजते.

जस्मीन शहा यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शहा यांचे नातेवाईक दिपू अशोककुमार जैस्वाल हे या हॉटेलच्या ३३९ क्रमांकाच्या रुममध्ये राहत होते.

जैस्वाल यांनी त्यांच्या सíव्हससाठी काही मुलींना रुममध्ये बोलाविले, असा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी चंद्रकांत मेटे आणि विलास हजारे यांनी दिली.

याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. या घटनेनंतर या दोघांनी त्यांच्याकडे उर्वरित पैशांची मागणी सुरूकेली.

मात्र दिपू जैस्वाल यांनी आयुक्त मारिया यांच्याकडेया पोलिसांची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.

प्राथमिक तपासात या दोघांनी १२ जानेवारी २०१५ रोजी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन दहा लाख रुपयांची मागणी करुन त्यांना खोटय़ा गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले होते.

त्यांच्या निलंबनाचा आदेश १९ फेबुवारीला आयुक्तांनी जारी केला. या दोघांची आता विभागीय चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी ठरल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले.

1 COMMENT

  1. जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत महादेव मेटे आणि विलेपाल्रे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास भास्कर हजारे दोन पोलिसांना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सेवेतून निलंबित केले, यावरून सामान्य जनतेस मुंबई पोलिस किती रक्षणकर्ते आहेत याचा अनुभव आला. याबद्दल पोलिस आयुक्त राकेश मारिया यांचे सामान्य जनता ऋणी राहतील. कित्येक वेळेस सामान्य व्यक्तीस हि गुंड बनवायचे किंवा पोलिसांमार्फत गेम वाजवायचा असा कट हि राजकारणात राहून कित्येक व्यक्ती करीत असतात. साधारण चाळीत असा प्रकार चालतो, आपल्या स्थानिक पोलिस चौकीतील एखाद्या अधिकाऱ्याशी हात मिळवणी करायची आणि जो व्यक्ती काही तरी करू शकतो त्याला समाजात हीन प्रवृत्तीचा आहे हे दर्शवून द्यायचे असे काम कित्येक राजकारणी व्यक्ती करत आले आहे. जोगेश्वरी (पूर्व) मेघवाडी पोलिस स्टेशन येथे एक डेमो करून बघा, सामान्य व्यक्तीची काही चुकी नसताना उगीच आरोपी म्हणून आणले जाते आणि उलट सुलट चार्जेस मारून त्याचे नाव काळ्या यादीत टाकून त्याच्या कामा धंद्याचा, राहत्या घराचा ताबा मिळवण्याचे काम कित्येक पोलिस अधिकारी करीत आहेत. अशा व्यक्ती त्याच्या राहत्या घरापासून ते तो जेथे काम करीत आहे तेथ पर्यंत आपली ओळख करून ठेवतो आणि एखादी खोटी तक्रार करून त्या व्यक्तीस आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करीत असतो. मुंबई पोलिसांकडे कायदा असल्या कारणाने कोणीही आमच्या वर्दीस हात लावू शकत नाही, पण आम्ही ह्या वर्दीचा उपयोग कोणत्याहि गैरकामा करिता करू शकतो. एखाद्या व्यक्तीस सतावण्यास त्याच्या घराच्या ठिकाणी किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी आपले चार पाच हस्तक ठेवून द्यायचे जेणे करून त्याला भरपूर त्रास देता येईल, यात मुंबई पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे. अशा वेळेस “सलाखे” चित्रपटातील अनुपम खेर यांची भूमिका आठवते. जेव्हा तो सत्य बोलतो तेव्हा मुंबई पोलिसांची मदत घेऊन त्या व्यक्तीस वेडा बनवण्यात येते आणि आत्महत्या करण्यास तेच मुंबई पोलिस प्रवृत्त करतात. अशा वेळेस त्याच्या मुलाने जर मुंबई पोलिसांवर हात उचलला म्हणजे तो आयुष्यातून उठला म्हणजे (आदमी उठता नही उठ जाता है). म्हणून असे चित्रपट बघण्याकरिता सुद्धा जोगेश्वरी (पूर्व), मेघवाडी पोलिस स्टेशन सारख्या कित्येक पोलिस चौकीत तक्रार नोंदवणा-या अधिकाऱ्या समोरच केबल टी वि बसवण्यात आला आहे, जेणेकरून एखाद्या वर अन्याय जरी झाला तरी तो आवाज उठवू शकत नाही कारण आमच्याकडे सरकारी वर्दी (खाकी) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version