Home महामुंबई दादरमध्ये फेरीवाल्यांची अशीही बनवाबनवी!

दादरमध्ये फेरीवाल्यांची अशीही बनवाबनवी!

2

मुंबईला फेरीवाल्यांनी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे पोखरल्याचे उघडकीस आले असताना महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून एकाचे दोन करण्याचा उद्योग त्यांच्यामार्फत सुरू आहे.

मुंबई- मुंबईला फेरीवाल्यांनी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे पोखरल्याचे उघडकीस आले असताना महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून एकाचे दोन करण्याचा उद्योग त्यांच्यामार्फत सुरू आहे. सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि नोंदणीची मोहीम पालिकेने हाती घेतली असली तरी प्रत्यक्षात मूळ फेरीवाल्यांपेक्षा ‘डमी’ फेरीवाले बसवून त्यांच्या नावाने अर्ज भरून घेतले जात असल्याचे उघड होत आहे.

दादरमध्ये एका जागेवर चार ते पाच जणांना उभे करून फेरीवाला असल्याचे दाखवून अर्जाचे वाटप होते. येथील एका दुकानमालकाने तब्बल ३५ ते ४० अर्ज आपल्याच नोकरांच्या नावे भरल्याचेही समजते.

प्रहार कौल-

[poll id=”721″]

दादरमध्ये निम्म्याहून अधिक फेरीवाल्यांची बनावट नोंदणी झाल्याने सर्वेक्षण वादात पडण्याची चिन्हे आहेत. पालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच ‘दी स्ट्रीट वेंडर्स अ‍ॅक्ट २०१४’ अन्वये पालिकेच्या हद्दीतील सर्व फेरीवाल्यांना ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी पथकामार्फत नोंदणी अर्ज आणि नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

मात्र दादरच्या छबिलदास, डिसिल्व्हा गल्ली, जावळे मार्ग, रानडे मार्ग, एन. सी. केळकर मार्ग येथे ८० टक्के फेरीवाले परप्रांतीय असून ते भाडेतत्त्वावर व्यवसाय थाटून आहेत. तेथे एकाच ठिकाणी चार ते पाच फेरीवाल्यांना उभे करत अर्जवाटप केल्याचे समजते. केशवसूत उड्डाणपुलाखाली तर तीन फेरीवाल्यांनी खास गावावरून नातेवाईकांना बोलावून व परिचितांना बोलावून त्यांच्या नावे तब्बल १५० अर्ज भरल्याचे ऐकायला मिळत आहे.

मनसेच्या एका पदाधिका-याची दादरमध्ये अनेक दुकाने असून लस्सी, वडापाव, लिंबू सरबतसारखे २० फेरीचे व्यवसाय त्याने थाटले आहेत. याच दुकानदाराने त्याच्या दुकानातील सर्व कामगारांच्या नावे फेरीवाला असल्याचे दाखवून नोंदणी अर्ज मिळवल्याची चर्चा आहे.

सर्वेक्षण व नोंदणीत मूळ फेरीवाले बाजूला राहिले असून परप्रांतीय आणि बांगलादेशी मुसलमान, बंगालींनी आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक कार्ड असल्याचा फायदा उठवत बनावट नोंदणी केल्याची तक्रार आहे.

बनवेगिरी करणा-या या फेरीवाल्यांनी मूळ रस्ता आणि पदपथही मोकळा सोडला नसून तेथे पथारी पसरून नोंदणी केल्याचे मूळ फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.
मात्र दादरप्रमाणे कांदिवली चारकोप, हुतात्मा चौक, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, कांदिवली, बोरिवली, दहिसर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, कुर्ला आदी भागांत हाच प्रकार सुरू आहे.

मनसेची स्टंटबाजी

दादरमध्ये मनसे नगरसेवक संदीप देशपांडे व सुधीर जाधव यांनी फेरीवाल्यांची ही नोंदणी बंद करायला लावली. मात्र त्यांची पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. येथील परप्रांतीयांकडून मनसेची खिल्ली उडवली जात आहे. मात्र एकीकडे फेरीवाला असल्याचे दाखवताना कांदिवली चारकोपमध्ये मनसेच्याच आशीर्वादाने फेरीवाल्यांनी पथारी पसरल्याने ही केवळ स्टंटबाजी असल्याचे बोलले जाते.

दादरमध्ये जमालगोटाची दादागिरी

दादरमध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण त्यांचा दलाल म्हणून कार्यरत असलेल्या ‘जमाल’ नामक व्यक्ती आणि फेरीवाल्यांच्या स्थानिक नेत्यांनी केले असून अधिकारी केवळ स्वाक्षरी, शिक्क्यापुरतेच मर्यादित आहेत.

तीन दिवसांत केवळ ६१ हजार अर्जाचे वाटप

नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर रविवारपर्यंत ६१ हजार फेरीवाल्यांना अर्जवाटप झाल्याचा दावा पालिकेच्या परवाना विभागाचे प्रमुख अधिकारी शरद बांडे यांनी केला आहे. सोमवारपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरितांचे अर्ज भरण्याची मोहीम सुरू राहील. त्यानंतर उर्वरितांकडून २८ जुलैपर्यंत अर्ज भरून घेतले जातील.

2 COMMENTS

  1. अहो कसले सर्वेक्षन करत बसता ? सगळ्या फेरीवाल्यांकडून हप्ता वसूल करा , वरपासून खालपर्यंत सगळ्यांचे खिसे भरा ,
    आणि गप्प बसा, बाईको पोरांचं भल कस होईल ते पहा , गणपती बाप्पा येत आहेत ,त्यांचे स्वगता साठी ” माया ” जमा करा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version