Home टॉप स्टोरी दिल्ली बलात्कार, आरोपीला अटक

दिल्ली बलात्कार, आरोपीला अटक

1

पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोज कुमारला बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या विरोधात दिल्लीत वातावरण तापू लागले आहे. शनिवारी सकाळी एम्स रुग्णालय आणि दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने झाली.

पिडित मुलीला न्याय देण्याबरोबरच, तपासात दिरंगाई करणा-या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मुलीची प्रकृती आता स्थिर असून, ती उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे एम्समधील डॉक्टरांनी सांगितले.

बलात्काराचा आरोप असलेल्या मनोज कुमारला बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली आहे. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला अटक केली. मनोजकुमार दिल्लीत गांधीनगर भागात या मुलीच्या शेजारी रहात होता.

मुलीचे अपहरण करुन चार दिवस तिला कोंडून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर अत्यंत क्रूर पध्दतीने या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या मुलीचे ओठ, छाती आणि गालाचे लचके तोडण्यात आले होते तसेच तिच्या मानेवरही खुणा होत्या. या मुलीवर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु असून, ही मुलगी उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेने दिल्लीत चार महिन्यांपूर्वी धावत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बालिकेवरील बलात्काराच्या घटनेनेही संपूर्ण दिल्लीत संतापाची लाट उसळली आहे.

दिल्ली सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत तीन पोलिसांनाही निलंबित केले आहे. दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या घटनेबाबत तीव्र शब्दांत दु:ख व्यक्त केले असून, आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

1 COMMENT

  1. देवाला माजी मानापासुन प्रार्थना ती लवकर बरी व्हावी आणि त्या नराधमाला लवकर शिक्षा व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना….!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version