Home टॉप स्टोरी दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद

दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद

1

पाकिस्तानच्या सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडून भारतात प्रवेश करुन दोन सैनिकांची हत्या केली.

जम्मू- शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकिस्तानच्या सैनिकांनी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नियंत्रणरेषा ओलांडून भारतात प्रवेश केला आणि सैन्याच्या गस्तपथकावर हल्ला करून दोन सैनिकांची हत्या केली. या दोन्ही सैनिकांचे शीर धडावेगळे करण्यात आल्याचे वृत्त आहे. यापैकी एक शीर पाकिस्तानी आपल्यासोबत घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन सैनिक शहीद झाल्याच्या वृत्ताला सैन्यातर्फे दुजोरा देण्यात आला मात्र, शिरच्छेदाबाबत काही सांगण्यात आले नाही.

[poll id=”129″]

लान्स नाईक हेमराज आणि लान्स नाईक सुधाकर सिंग अशी शहीद सैनिकांची नावे आहेत. पाकिस्तानी सैनिक जम्मू भागातील पूँछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेच्या १०० मीटर आतपर्यंत घुसले. त्यांच्या हल्ल्यात आणखी एक सैनिक जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या बॉर्डर अँकक्शन टीमने पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी भागात घुसखोरी करून भारतीय सैन्याच्या गस्तपथकावर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या वाढलेल्या कारवायांचाच एक भाग असल्याचे सैन्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हा भाग जंगलांनी व्यापलेला असून सध्या पडलेल्या दाट धुक्याचा फायदा घेऊन पाकिस्तानी सैन्याने ही घुसखोरी केली. भारतीय सैनिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, सुमारे अर्धा तास ही चकमक चालली. गेल्या काही आठवडयांपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीमध्ये गोळीबार केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मंगळवारची घटना त्यापैकी सर्वात गंभीर असल्याचे मानले जात आहे.

1 COMMENT

  1. आमच्या देशाचे दुर्दैव असे आहे की, आपले देशप्रेम फक्त काळया फीती लावणे, मेणबत्या लावणे इतपतच आहे. आपल्या षंढ राज्यकर्त्यांना जरा सुध्दा शरम नाही ह्या पाकड्यांबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायला, बोलवा हरामखोरांना भारतात, त्यांना विझा द्या, सिनेमामध्ये काम द्या, रहायला मुंबई सारख्या शहरात जागा सुध्दा द्या, विवीध कार्यक्रमात आपल्या देशातील दिग्गज कलावंतांच्या मांडीला मांडी लाऊन बसा, सिरिअल्स मध्ये काम करा, इथे येऊन नुसता नंगा नाच करा, हैदोस घाला, इथे तुम्हाला कोणी काही सुध्दा बोलणार नाही आणी काही सुध्दा करणार नाही. खरं तर हे सर्व देण्या घेण्याचे मुर्ख, फाजील लाड आपल्या राज्यकर्त्यांनी बंद केलेच पाहीजे. सगळ्यात कहर म्हणजे, म्हणे दोन देशात क्रिकेटचे सामने खेळण्यानी आपले संबंध सुधारतील हे जे मुर्खपणाचे, खुळ ज्यांनी कोणी काढले त्यां सर्वांना सीमेरेशेपलीकडे सोडून यावे. ते एक प्रकारे देशद्रोहीच आहेत जे पाकिस्तानमधील लोकांना आपल्या देशात बोलावून लाड करतात. आपणच ही हिरवी वळवळ्णारी कीड चिरडून काढली पाहिजे….आता बस झाले कुत्रांना पोसणे…. पिसाळलेल्या कुत्रांना वेळीच गोळ्या घातल्या पाहीजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version