Home टॉप स्टोरी धर्मनिरपेक्ष काँग्रेस लागली साधू-संतांच्या भजनाला

धर्मनिरपेक्ष काँग्रेस लागली साधू-संतांच्या भजनाला

1

धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसच्या विचारधारेला हरताळ फाशीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी चक्क ‘संत – महंत कक्ष’ बनविला असून हे करताना त्यांनी कोणाही वरिष्ठ नेत्याला विश्वासात घेतलेले नाही. महाराष्ट्राचे प्रभारी असणारे मोहन प्रकाश यांना याबाबत विचारले असता असा कोणताही मंच स्थापन करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मुंबई –  धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसच्या विचारधारेला हरताळ फाशीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी चक्क ‘संत – महंत कक्ष’ बनविला असून हे करताना त्यांनी कोणाही वरिष्ठ नेत्याला विश्वासात घेतलेले नाही. महाराष्ट्राचे प्रभारी असणारे मोहन प्रकाश यांना याबाबत विचारले असता असा कोणताही मंच स्थापन करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यापासून संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या रणनितीपर्यंत निरुपम यांनी मनमानी केल्यामुळेच पक्षाला मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी तर याबाबत जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती. आता धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसची विचारधारा असताना आता संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेसचा ‘संत-महंत कक्ष’ बनविला असून त्याची बैठक रविवारी पार पडली.

मुंबई काँग्रेसने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यानुसार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे साधुसंतांसाठी एक कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षाचे नाव ‘संत-महंत काँग्रेस’ असे आहे. निरुपम यांच्या या कक्षाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे. काँग्रेसची विचारधारही धर्मनिरपेक्षतेची आहे. अशी असताना निरुपम यांनी फक्त हिंदू विरोधी काँग्रेसची बनविली जाणारी प्रतिमा पुसण्याचा केविलवाना प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याबद्दल काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे अशा प्रकारच्या कक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

1 COMMENT

  1. “थापा मारू नका” धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसची विचारधारा कधीहि नव्हती. देशाची फाळणी हिंदू – मुस्लिम अशी काँग्रेसनेच केली.
    इफ्तार पार्टी हि धर्मनिरपेक्षतेमध्ये येते का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version