Home महाराष्ट्र धर्मानंद कोसंबी यांची समाधी उपेक्षित

धर्मानंद कोसंबी यांची समाधी उपेक्षित

1

आधुनिक भारताचे बुद्धघोषाचार्य आणि पाली भाषा साहित्याचे आध्य प्राध्यापक धर्मानंद दामोदर कोसंबी यांची समाधी गांधीजींच्या कर्मभूमीत सेवाग्रामात उपेक्षित असल्याचे त्यांच्या नऊ ऑक्टोबरला झालेल्या १३६ व्या जयंती दिनी निदर्शनास आले आहे.वर्धा  –  आधुनिक भारताचे बुद्धघोषाचार्य आणि पाली भाषा साहित्याचे आध्य प्राध्यापक धर्मानंद दामोदर कोसंबी यांची समाधी गांधीजींच्या कर्मभूमीत सेवाग्रामात उपेक्षित असल्याचे त्यांच्या नऊ ऑक्टोबरला झालेल्या १३६ व्या जयंती दिनी निदर्शनास आले आहे.

गोव्यात नऊ ऑक्टोबर १८७६ मध्ये जन्मलेले धर्मानंद कोसंबी यांनी गरिबीतही स्वप्रयत्नाने अध्ययन करून ते विद्वान झाले. बुद्धाच्या चरित्र वाचनातून त्याविषयी जिज्ञासा निर्माण होऊन पाली भाषेच्या अभ्यासाकडे वळले. पाली भाषेचे देशातील पहिले प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. त्यांनी बर्मा, श्रीलंका व रशिया या देशांत भ्रमणही केले. शेवटी कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापकी सोडून ते स्वातंत्र्याच्या लढय़ात उतरले. १९४७ च्या जानेवारीत ते गांधीजींच्या आमंत्रणावरून सेवाग्राम आश्रमात आले. तेव्हा त्यांनी सत्तरी ओलांडली होती. त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटी आमरण उपोषण करून चार जून १९४७ ला देह त्यागला.

आधुनिक भारताचे बुद्धघोषाचार्य आणि शेवटी गांधी विचाराची कास धरणाऱ्या कोसंबींनी अंतिम विसावा सेवाग्रामच्या भूमीत घेतला. तेव्हापासून त्यांचे अग्निसंस्कार समाधीस्थळ दुर्लक्षित पडलेले आहे.

नव्वदच्या दशकात वर्ध्यातील पत्रकारांनी हे समाधीस्थळ वृत्तपत्रामधून लेख लिहून प्रकाशझोतात आणल्यावर तेव्हापासून समता सनिक दलातर्फे दर जयंती-पुण्यस्मरणाला पुष्पांजली अर्पण केली जाते. वध्र्यात फेब्रुवारी २००५ मध्ये झालेल्या आठव्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ .गंगाधर पानतावणे, उद्घाटक बाबुराव बागुल, कवी अरुण काळे, खा. दत्ता मेघे आणि संमेलनाचे कार्योपाध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी समाधीस्थळी आदरांजली अर्पण करूनच संमेलनाचे उद्घाटन केले

होते. ही एकमेव घटना सोडल्यास या समाधीकडे बौद्ध साहित्यिक, विचारवंत, गांधीवादी आणि सरकारने देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आता तरी सरकारने कस्तुरबा रुग्णालयाच्या मागील बाजूला दुर्लक्षित समाधीस्थळी स्मारक उभारून या बुद्ध पंडिताच्या स्मृती जपाव्यात, अशी मागणी होत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version