Home देश धोनी-साक्षीला कन्यारत्न

धोनी-साक्षीला कन्यारत्न

1

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

गुडगाव – भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विश्वचषक अवघा आठवड्यावर येऊन ठेपला आहे त्यापूर्वीच धोनीला ही आनंदाची बातमी मिळाली आहे.  गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात धोनीची पत्नी साक्षीने शुक्रवारी संध्याकाळी गोंडस कन्येला जन्म दिला.

ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी धोनी व्यस्त आहे. त्यामुळे विश्वचषक झाल्यानंतर त्याला आपल्या मुलीला पाहता येणार आहे. धोनीची पत्नी साक्षी नेहमीच धोनी सोबत परदेश दौ-यावर येत असे मात्र यावेळी ऑस्ट्रेलिया दौ-यावर ती धोनीसोबत नव्हती.

चार जुलै २०१० मध्ये महेंद्रसिंग धोनीने बालपणीची मैत्रीण साक्षी हिच्याशी विवाह केला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version