Home महाराष्ट्र नगरसेवकाने पेटवून दिल्याचा महिला पोलिसाचा आरोप

नगरसेवकाने पेटवून दिल्याचा महिला पोलिसाचा आरोप

0

आपल्या सरकारी निवासस्थानात शनिवारी मध्यरात्री घुसून राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पोटे आणि त्यांच्या समवेत आलेल्या अनोळखी ५ ते ६ जणांनी रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद निलंबित महिला पोलिस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

बारामती- आपल्या सरकारी निवासस्थानात शनिवारी मध्यरात्री घुसून राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पोटे आणि त्यांच्या समवेत आलेल्या अनोळखी ५ ते ६ जणांनी रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद निलंबित महिला पोलिस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुनील पोटे यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक दीपाली शिंदे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा पदाधिकारी विशाल मेहता यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून याच सरकारी निवासस्थानात १० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. शनिवारी मध्यरात्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाचा दरवाजा १ ते १.३०च्या सुमारास जोराने वाजवून उघडण्यास भाग पाडले. दाराच्या कडय़ाही तोडल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच नगरसेवक सुनील पोटे आणि अन्य अनोळखी ५ ते ६ जणांनी शिवीगाळ करत धमकी देऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्या वेळी शिंदे यांच्या पतीने त्यांना वाचवले. मात्र दीपाली यांच्या हाताला, पाठीला भाजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांनी बारामतीत दाखल होऊन पाहणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये निलंबित उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांच्यावर आपण फिर्याद दिल्याने कारवाई झाली. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. यासंदर्भात कोणत्याही चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचे नगरसेवक सुनील पोटे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version