नाजूक त्वचा

1

हल्लीचे धकाधकीचे आयुष्य, मानसिक ताणतणाव, चुकीची आहारपद्धती, पाश्चिमात्यांचे अंधानुकरण इ. मुळे आपण त्वचारोगाला कधी बळी तडतो, हे कळतसुद्धा नाही!! त्वचारोग हा मोठा रोग नसला तरी त्यावर वेळीच औषध उपचार होणं गरजेचं आहे. त्वचारोग हा फक्त त्वचेवर दिसत असला तरी त्याचे मूळ शरीरात आतपर्यंत असते. त्यामुळे ते समजणं आवश्यक असतं. त्वचारोगांच्या लक्षणावरून तो शरीरात किती आणि कुठपर्यंत भिनला आहे हे समजू शकते. त्वचा खूप नाजूक असते, म्हणून त्रास होत असेल तर त्यावर वेळीच उपचार करावे. अशा प्रकारे अनन्यसाधारण महती असलेल्या त्वचा आणि त्वचारोगाबद्दलची ही माहिती.

माझ्या रुग्णालयात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रुग्ण आला. डाव्या हाताच्या खाली काखेमध्ये त्याला जळजळ होत होती. गेले तीन-चार दिवस त्याला हा त्रास होत होता. काही केल्या त्याची जळजळ थांबेना, असं तो म्हणत होता. त्याचं मी परीक्षण केले तर असे दिसून आले की काखेत बारीक पुरळ असून त्या पुरळातून पाण्यासारखा द्राव येत आहे. काही केल्या त्या रुग्णाला बरं वाटत नव्हतं म्हणून लगेचच मी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. प्रथम रुग्णाचं रक्तमोक्षण (रक्त काढणे) करण्यात आलं. एका तासात त्वचेवरील सूज कमी झाली, लालपणा आणि दाह कमी झाला त्यामुळे रुग्णाला बरं वाटू लागलं. खरं तर नागीण आल्यावर ती किमान एक किंवा अधिक महिने अंगावर असते. पण या उपचाराने रुग्णाला लगेचच बरे वाटले. नियमित तपासणीसाठी रुग्ण आला तेव्हा त्याला काहीच त्रास होत नव्हता, असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर नागीण पूर्णपणे बंरी होण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली आहे. आयुर्वेदामध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंट नाही असा समज आहे. परंतु, अशा उदाहरणांनी आपला आयुर्वेदावर लगेच विश्वास बसू शकतो. 

कारणे

» आहारातील काही चुकीच्या सवयी : आंबट, खारट, तिखट इ. पदार्थाचे अतिसेवन. दही, आंबवलेले पदार्थ, तीळ, उडीदसारखे उष्णवीर्याच्या पदार्थाचे अतिसेवन. आधीचे पचण्याआधीच पुढील आहार घेणे (अजीणांशन).

» दिवसा झोपणे

» उन्हात फिरणे

» सौंदर्यसाधनांचा अतिवापर

» नियमितपणे स्वच्छता न पाळणे इ.

» वायुप्रदूषण

» अशुद्ध पाण्याचा वापर

» कीटक दंश

» मानसिक ताणतणाव इ.

त्वचारोगाचे पूर्वरूप

अचानकपणे त्वचेचा रंग बदलणे, अतिरिक्त कंड सुटणे, घाम न येणे/ अतिरिक्त घाम येणे, दाह, ज्वर (ताप), पुरळ उठणे इ. लक्षणांनी त्वचा रोगाची सुरुवात होऊ शकते.
व्यवहारात दिसणा-या काही त्वचा विकारांचा केलेला हा घोषवारा..

विसर्प (herpes zoaster)

यालाच बोलीभाषेत ‘नागीण’ असं म्हणतात. त्वचेवर ठिकठिकाणी लहान-मोठी पुरळं उठून सूज येते. ही पुरळ सर्वत्र शरीरावर पसरते आणि दाह निर्माण करतो. म्हणून याला विसर्प / परिसर्प असं म्हणतात. रक्तदुष्टीकर आहार अतिप्रमाणात सेवन केल्याने व पित्तप्रधान दोषांची दुष्टी झाल्याने हा विकार होतो. यामध्ये पंचकर्मातील वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण या कर्माचा फायदा होतो. लक्षणानुरूप वमन किंवा विरेचन यामध्ये देता येते. विसर्पामध्ये रक्तमोक्षण एकीकडे आणि इतर सर्व उपचार एकीकडे अशी तुलना ग्रंथांमध्ये आढळते.
यामध्ये रसात्मक आणि शीतवीर्य असलेल्या औषधांचा लेप उपयोगी ठरतो. तसंच गंधक रसायन, चंद्रकलारस, मौतिकयुत्ककामदुधा इ. औषधी कल्पाचा वापर यामध्ये करता येतो.

विचर्चिका (eczema)

यामध्ये कडू, पिडका अधिक प्रमाणात असून त्यातून स्त्रावही मोठय़ा प्रमाणात वाहतो. यात खाजवल्यावर रुग्णास बरं वाटतं. अतिप्रमाणात खाजवल्यावर पिडकांमधून रक्त येतं व जखमा होतात. योग्य ती काळजी न घेतल्यास या जखमा चिघळू शकतात. यामध्ये रामबाण ठरणारा उपाय म्हणजे जलौकावचारण leach therapy जळवा फक्त अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि स्थानिक रक्तदुष्टींचा नायनाट करतात.
यामध्ये लेपनासाठी मरिच्यादी तेलासारखी कल्प वापरता येतात. तसेच पंचतिक्तधृतगुग्गुळ, गंधक रसायन यांसारखी औषधी कल्प यात वापरता येतात.

शीतपित्त (urticaria)

यालाच बोलीभाषेमध्ये ‘अंगावर पित्त उठणे’ असं म्हणतात. पित्तदुष्टीकर आहार व विहारमुळे उद्भवणारे शीतपित्त व्यवहारात अनेक वेळा त्रासदायक ठरू शकतं. यामध्ये त्वचेवर असमान स्वरूपात लालसर अशा गांधी उठतात. यात प्रचंड खाज सुटते. रुग्ण कासावीस होतो. रक्तमोक्षण हा यावरील जालीम व तत्काळ फलदायी असा उपाय आहे.याचसोबत मौक्तिकयुक्त कामदुधा, आरोग्यवर्धिनी यासारखे कल्प वापरता येतात.

दद्रु (ring worm)

यामध्ये मंडलाकृती पुरळ त्वचेवर उठतं. काही वेळा मंडलाची कड ही उचललेली, लाल, कंडूयुक्त असून मध्यभाग प्राकृत असतो. यामध्ये विरेचन अतिशय फलदायी ठरतं. तसंच अभ्यंतर चिकित्सेत कृमिकुठार रस, आरोग्यवर्धिनीसारखे कल्प उपयोगी ठरतात.

1 COMMENT

  1. Tvachya rogavar Gomutr ha ramban upay aahe. Ratri zopnyapurvi halkya hatane badhit tvachevar lavane (malish karu naye) aani sakali dhune. Dukhbe bare zalyavar band karave.

    Aadhi chachani karavi, jar tvachela chalat asel tar karave. Mala far anubhav aahe, je tvachechya tadnyala nahi jamle te Gomutrane karun dakhvile. Mazya natevaikala pan fayada zala hota.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version