Home टॉप स्टोरी नारायण राणे मांडणार आपल्या रोखठोक भूमिका ‘सोशल मीडिया’द्वारे!

नारायण राणे मांडणार आपल्या रोखठोक भूमिका ‘सोशल मीडिया’द्वारे!

1

रोखठोक व अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने महाराष्ट्र गाजवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

मुंबई- आपल्या रोखठोक व अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने महाराष्ट्र गाजवणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉगचा वापर करून नारायण राणे वेळोवेळी आपली राजकीय भूमिका, समकालीन घटनांशी निगडित भाष्य याद्वारे लोकांशी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत.

स्वतंत्र भारताला लोकशाही यंत्रणा मिळवून देणारा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवसापासूनच श्री. राणे यांनी जनतेशी थेट नाळ जोडणाऱ्या समाज माध्यमावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रहार’च्या ‘हार आणि प्रहार’ या सदराप्रमाणेच यापुढे ब्लॉगवरही (menarayanrane.com) नियमित लिखाण करणार असल्याचा इरादा श्री. राणे यांनी स्पष्ट केला आहे. श्री. राणे यांच्या फेसबुक पेजच्या (facebook.com/MeNarayanrane) माध्यमातून आपल्याला त्यांचे राजकारण-समाजकारण यावरील भाष्य, सरकारमध्ये असताना केलेली कामे, साहित्य-संस्कृती-क्रीडा या क्षेत्रांबद्दलच्या त्यांच्या जाणिवा वेळोवेळी व्यक्त करत राहतील.

अतिशय कमी शब्दांत मोठा आशय जलद गतीने पसरवणारे माध्यम म्हणजे ट्विटर. ट्विटरच्या (twitter.com/MeNarayanRane) माध्यमातून राजकीय घडामोडींबद्दलचे अधिकृत मतप्रदर्शन ते करतील.

महाराष्ट्रातील तमाम जनतेला पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण श्री. राणे यांना लाईक, फॉलो करून त्यांच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक- facebook.com/ MeNarayanRane

ट्विटर- twitter.com/ MeNarayanRane

ब्लॉग- http://menarayanrane.com

1 COMMENT

  1. Jai Ho.

    आपले काम व आशय एवढा बुलंद आहे, कि जनताच् आपल्याला विचारेल, बोल तेरी रज़ा क्या है !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version