Home टॉप स्टोरी नार्वेकरांच्या रुपाने राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का ?

नार्वेकरांच्या रुपाने राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का ?

1

लोकसभा निवडणूकीचा प्रचार रंगात येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबई – लोकसभा निवडणूकीचा प्रचार रंगात येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणूकीतून माघार घ्यावी लागल्याने नाराज असलेले शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

राहुल नार्वेकरांनी रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. विधानपरिषद निवडणूकीतून माघार घ्यावी लागल्याने मी व्यथित झालो आहे. पक्षाने याबद्दल स्पष्टीकरण दिले पाहिजे. शिवसेना नेतृत्वाने सांगितल्यानंतर आपण आपली उमेदवारी मागे घेतली असे नार्वेकरांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

यापूर्वी देखील विधानपरिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नार्वेकरांनी माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे यावेळी नाराज झालेल्या नार्वेकरांनी बंडाचे संकेत दिले आहेत.

नार्वेकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर तो निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी आणखी एक धक्का असेल. यापूर्वी शिर्डीचे शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर, कल्याणचे खासदार आनंद परांजपे आणि मावळचे खासदार गजानन बाबर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version