Home मजेत मस्त तंदुरुस्त निखळ त्वचा खुलवते सौंदर्य..

निखळ त्वचा खुलवते सौंदर्य..

1

अनेकांना थोडयाशा उन्हाचाही प्रचंड त्रास होतो, कित्येकांना तर उन्हामध्ये बाहेर पडताना शरीर पूर्णत: झाकून घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. अशा अतिसंवेदनशील त्वचेविषयीची प्रातिनिधिक समस्या आणि त्यातून आयुर्वेदीय उपचार सुचविणारा संवाद..

प्रश्न : सर, माझी त्वचा फोटोसेंसिटिव्ह (प्रकाश तीव्रग्राही-संवेदी) आहे. गेली कित्येक वर्ष मला उन्हामध्ये बाहेर पडताना भीती वाटते. माझ्या त्वचेचा रंग उन्हामुळे काळसर होतो. आणि तो पुन्हा पूर्ववत व्हायलाही बरेच दिवस लागतात. संपूर्ण शरीरावर डाग (पॅचेस) येतात. कधी ते चॉकलेटी असतात तर कधी अगदी काळ्या रंगाचे असतात. उन्हात तर अशा प्रकारचे डाग वाढतात.

काही दिवसांपासून अधिक प्रमाणात मुरमंही येत आहेत. पूर्वीपेक्षा आता या मुरमांचं प्रमाणही खूप वाढलंय. चेह-याबरोबरच मानेवर, खांद्यावर तसंच पाठीवरही ही मुरमं येतात. मुरमं खूपच कडक आणि खोलवर गेलेली आहेत. ती दुखतातही. त्यांना पिकायला बराच वेळ लागतो. ज्या ज्या ठिकाणी मुरमं झालीयत त्या सर्व ठिकाणी काळे डाग पडतात आणि ते कायम स्वरूपात राहतात. मला लवकर बरं करा. दोन महिन्यांनंतर माझं लग्न ठरलंय.

माझ्या होणा-या नव-याने मला अनेक ब्युटी पार्लर्स, स्कीन स्पेशलिस्ट तसंच कॉस्मेटोलॉजिस्टची नावं सुचवली. पण रसायनयुक्त औषधांमुळेही माझ्या शरीराला त्रास होतो, मला ती सूट होत नाहीत. मी फेशिअलसुद्धा हर्बलचंच करते. माझी त्वचा खूपच संवेदनशील आहे.

उत्तर : स्मिताताई, तुम्हाला माहीत असेलच की त्वचेचा रंग आयुर्वेदाप्रमाणे पित्तदोषामुळे बदलतोय. तुम्ही जर पित्तप्रकृतीचे असाल तर उन्हामध्ये नैसर्गिक पित्त वाढतं किंवा ऊन अंगावर घेतल्यास पित्त वाढतं. अशा अवस्थेत पित्त वाढेल असे आंबट-तिखट तळलेले पदार्थ अधिक खाल्ल्यास पित्ताचं प्रमाण आणखी वाढतं. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो. फोटोसेंसिटिव्हिटी विशेषत: पित्त वाढल्यामुळे येते. यासाठी कोणतीही तात्पुरती उपचार पद्धती नाही. थोडया प्रमाणात (पथ्यपालन) प्रकृतीनुसार खाणंपिणं ठेवावं तसंच आपल्या नेहमीच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव, रात्रीचं जागरण, बद्धकोष्ठता आणि मासिकपाळी नियमित वेळेवर न येणं, या सर्व गोष्टीही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी सुरळीत असणं नितांत गरजेचं असतं.

ही समस्या कमी वेळात आटोक्यात आणता येते, पण त्यासाठी औषध, आहार आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टी प्रमाणात बदलाव्या लागतील. औषधांमध्ये कडुनिंब, बाहवा, तुळस, कात, सारिवा, हळद, गुळवेल आणि मंजिष्ठासारखी औषधं घ्यावी लागतील. आहार आणि जीवनशैली या दोन्ही गोष्टी त्यांच्या दैनंदिनीविषयी चर्चा करून ठरवता येतील. आयुर्वेदिक स्पा बाबतीत ऐकलंय? आठवडय़ातून तीनदा स्पा घेऊन उपचार घ्यावे लागतील.

त्यात हर्बल पावडर मसाजमध्ये (एक्सफोलिएशनसाठी – निर्जीव पेशीजालावरील पृष्ठभागावरून पातळ पापुद्रे सुटणे) वैद्यांनी सिद्ध(मेडिकेटेड) केलेलं ‘मिल्क धारा’ केलं जातं. त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो, तसंच त्वचेच्या पोषणासाठी व फेसपॅक आणि हर्बल बॉडी पॅक (अनेक प्रकारच्या औषधी एकत्रित करून) मुरमांवर तसंच त्याच्या आसपासच्या भागावर लावून शरीर काही वेळेसाठी टॉवेलने गुंडाळून ठेवावं लागतं. १०-१२ सीटिंग घेतल्याने पुष्कळच फायदा होतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version