Home क्रीडा नितेश राणे यांची क्रिडाविश्वात गरुडझेप

नितेश राणे यांची क्रिडाविश्वात गरुडझेप

1

ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी ‘विनोद कांबळी क्रिकेट अॅ्कॅडमी’ ची स्थापना केल्याचे जाहिर केले.

कणकवली- ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देण्यासाठी सोमवारी आमदार नितेश राणे यांनी ‘विनोद कांबळी क्रिकेट अॅ्कॅडमी’ ची स्थापना केल्याचे जाहिर केले. ही अॅदकॅडमी भारताच्या ग्रामीण भागात स्थापन केलेली पहिली अॅ्कॅडमी आहे. शहराप्रमाणेच सोयी सुविधा देऊन या अॅॅकॅडमीतुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडविले जातील असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर मी ६ महिन्यांत टेनिसबॉल खेळणा-या क्रिकेट यंगस्टारांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वापरल्या जाणारा सिझनबॉल खेळण्याचे प्रशिक्षण देईन आणि या अॅीकॅडमीतुन सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे महान खेळाडू सिंधुदुर्गातून घडवेन, असा दृढ विश्वास भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु विनोद कांबळी यांनी व्यक्त केला.

हॉटेल निलम कंट्रीसाईड येथे भरगच्च पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी जिल्ह्यातील आणि देशातील पहिल्या ग्रामीण भागातील क्रिकेट अकॅडमीची घोषणा केली. यावेळी क्रिकेट अकॅडमीचे नाव देण्यात आलेले क्रिकेटपटू विनोद कांबळी, वानखेडे व राज्यातील बहुतांश स्टेडियमचे सुव्यवस्था पाहणारे नदीम व ऋषिकेश भावे उपस्थित होते. त्यांनीही प्रशिक्षणासाठी दर्जेदार धावपट्टी आणि स्टेडिअम उभे करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. ही विनोद कांबळी क्रिकेट अकादमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरानजिक असलेल्या कलमठ येथे होणार आहे. १ फेब्रुवारीपासुन या अॅ्कॅडमीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत नितेश राणे आणि विनोद कांबळी यांनी सांगितले.

नितेश राणे म्हणाले, विनोद कांबळींचा मला अभिमान वाटतो. तो ताकदीने खेळणारा खेळाडू आहेच. त्याबरोबर चांगले मन असणारा कोकणचा सुपुत्र आहे. ज्यावेळी मी त्याला अॅकॅडमीची कल्पना बोलून दाखविली. त्यावेळी त्याने त्वरित होकार दिला. ग्रामीण भागात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणांमध्ये क्रिकेटची फार मोठी आवड आहे. टुर्नामेंटच्या माध्यमातून ही तरुणाई सातत्याने क्रिकेट स्पर्धा खेळत असते. मात्र त्यांच्या खिलाडूवृत्तीचा त्यांच्या क्षमतेचा देशाला फायदा व्हावा. जिल्ह्यातील चमकदार कामगिरी करणा-या क्रिडापटुंना रणजी, आयपीएल, टेस्ट मॅच त्याचप्रमाणे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये खेळता यावे आणि त्यासाठीची तयारी करण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि सक्षम अॅटकॅडमी असावी म्हणून माजी क्रिकेटपटु विनोद कांबळी यांच्या नावाने ही अॅणकॅडमी आपण सुरु करत आहोत. या अॅाकॅडमीत सर्व मुले-मुली सहभागी होऊ शकतात. महिन्यातुन पाच वेळा स्वत: क्रिकेटपटु विनोद कांबळी प्रशिक्षण देण्यासाठी याठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर बॉलिंग, फिल्डींग, बॅटींग, विकेटकिपर या वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रशिक्षणासाठीही क्रिडा क्षेत्रातील आणखी काही तज्ज्ञ प्रशिक्षक येणार आहेत. वैभववाडीच्या पुनम राऊत यांनी महिला क्रिकेट स्पर्धेत दाखवलेली चमक आणि केलेली कामगिरी लक्षात घेता या अॅयकॅडमीतुन मुलींनाही प्राधान्य दिले जाईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु विनोद कांबळी म्हणाले की, आपण ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील होतो. नितेश राणे यांच्या पुढाकाराने हे काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. क्रिडा क्षेत्रात कपिलदेव, महेंद्रसिंग धोणी, सुरेश रैना अशी अनेक नावे सांगता येतील जी ग्रामीण भागातून क्रिकेट जगतात आलेली आहेत. ग्रामीण भागातील टुर्नामेंट खेळणा-या विद्यार्थ्यांना भविष्य काय असे विचारत असाल तर त्यांच्यासाठी आजपासुन विनोद कांबळी अॅेकॅडमी हे भविष्य आहे. शिकायचे असणा-यांना याठिकाणी योग्य प्रशिक्षण देऊन सचिन तेंडुलकर,विनोद कांबळींसारखे क्रिकेटपटु घडवु. मी आणि सचिन आम्ही दोघेही टेनिसबॉल खेळणारे क्रिकेटर होतो. तुमच्यासारखे सामान्य कुटुंबात जन्मलेलो होतो. बॉलर बॉय म्हणून काम करत होतो. त्यावेळी वर्ल्डकपमध्ये देशासाठी खेळण्याची इच्छा बाळगून होतो. भविष्यात ती इच्छा आम्ही पुर्ण केली. तुम्हीही इच्छाशक्ती बाळगा. त्यासाठी मैदानात येऊन उतरले पाहिजे. खेळणे आणि शिकणे हे दोन्हीही महत्त्वाचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुंबई, पुणे, नागपुर अशा शहरी भागातही कोच म्हणून काम करू शकलो असतो. मात्र ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे सिंधुदुर्गात आलो असल्याचे विनोद कांबळी यांनी सांगितले. कुशल खेळाडू घडविण्यासाठी खेळाडूंवर वैयक्तिक लक्ष देता यावा म्हणून प्रशिक्षणार्थीची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पहिल्या बॅचमध्ये फक्त ४० खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. व उर्वरित खेळाडूंना पुढच्या बॅचमध्ये संधी दिली जाणार आहे, असे विनोद कांबळी यांनी सांगून तुम्ही फक्त मैदानात पाऊल टाका, मनापासुन शिका, पुढची जबाबदारी माझी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

..तर राणे कुटुंबियांनी क्रिकेट मैदान गाजविले असते

राजकारणात आलो नसतो तर राणे कुटुंबीय आज क्रिकेटमध्ये असले असते. राजकारणाप्रमाणेच चौकार व षटकाराची आतषबाजी राणे साहेबांनी क्रिकेट मैदानात यापुर्वी केली आहे. इनकम टॅक्स ऑफीसमध्ये असताना साहेबांनी संघाचे नेतृत्व करुन विजयश्री मिळवून दिली होती. क्रिकेट खेळताना त्यांनी अनेकांच्या विकेट घेतल्या आणि आताप्रमाणेच चौकार आणि षटकार त्यांनी क्रिकेट स्पर्धेतही मारलेले आहेत. राणेसाहेब एम.सी.ए मध्ये (महाराष्ट्र क्रिकेट असो.) गेले पाहिजे होते, असे अनेकांना वाटते. या क्रिकेट प्रेमामुळे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूला रणजी ट्रॉफी, आयपीएल सारख्या स्पर्धेत संधी मिळावी म्हणून ही अॅकॅडमी प्रयत्नशील असणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version