Home महाराष्ट्र कोकण निलेश राणे गुहागरमधून लढणार

निलेश राणे गुहागरमधून लढणार

1

माझा पराभव हा भास्कर जाधवांसारख्यांच्या वृत्तीमुळे झाला असून हा पराभव आपल्या फार जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवाची जशास तशी परतफेड करण्यासाठी मी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदार संघामधून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
गुहागर- ‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये भास्कर जाधव यांनी छुपे षड्यंत्र रचून मला पाडण्याचे काम केले. सिंधुदुर्गात माजी आमदार दीपक केसकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझ्याविरोधात फितवण्याचे कामही जाधवांनी केले. माझा पराभव हा भास्कर जाधवांसारख्यांच्या वृत्तीमुळे झाला असून हा पराभव आपल्या फार जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवाची जशास तशी परतफेड करण्यासाठी मी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदार संघामधून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. हा निर्णय माझा मीच घेतला असून या माझ्या निर्णयाची माझे वडील व काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना कसलीही कल्पना नाही’’ अशी घोषणा  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

‘‘आपण काँग्रेसचेच कार्यकर्ते असून यापुढेही काँग्रेसचेच काम करणार आहे. पण जाधवांनी आपल्याविरोधात केलेल्या कटकारस्थानाला उत्तर देण्यासाठी येथे भास्कर जाधव या आघाडीच्या उमेदवाराविरोधात नाही तर एका व्यक्तीविरोधात लढण्याचे मी निश्चित केले आहे. त्याची घोषणा सर्वप्रथम आज तुमच्यासमोर करत आहे,’’, असे निलेश राणे यांनी गुहागर विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. गुहागर विधानसभा मतदारसंघात चिपळूण तालुक्यातील काही गावे येतात. या गावांना शनिवारी सकाळी निलेश राणे यांनी भेट दिली. या दौ-यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या लढाईसाठी २३ ऑगस्टपासून गुहागरमध्ये तळ ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राणे पुढे म्हणाले, मला वाटले असते तर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढू शकतो. परंतु, माझे सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यावरही खूप प्रेम व ओढ आहे.

हा मतदारसंघ माझ्याकडे आल्यानंतर मी गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात व वाडीवाडीत पोहचण्याचे तसेच सरकारच्या योजना सर्वापर्यंत पोहचवण्याचे यशस्वी काम केले. परंतु, जाधवांनी गुहागर विधानसभा मतदार संघात स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी जनतेला, कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम वेळोवेळी केले. त्यांनी गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर स्वत:चे अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये गुहागरमधून सुनील तटकरे यांना अपेक्षित मतांऐवजी अवघ्या मोजक्या मतांची आघाडी मिळाली आणि त्यांचा निसटता पराभव झाला.

जाधवांनी अनेकांचे रस्ते, पाणी अडवून आपल्याकडे मते वळविण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे घाणेरडे राजकारण, ही मस्ती व गुर्मी जिरवण्यासाठीच मी आज सर्वाच्यावतीने निवडणुकीला उभे राहण्याची घोषणा करीत आहे.

1 COMMENT

  1. ह्या हो Kai साइबानु ? भास्कर सैबांच्या पोरांच्या ( मुला ,मुलींच्या ) लग्नात तुम्ही आणि मोठे Saaheb ( दादा ) कधी हजेरी लावतात ,कधी ,तुम्ही तेंका धमकी दितात,कधी भास्कर साहेबांच्या सोबत बसून chayचो आस्वाद घेतात ,आणि Aata धमकी देउन tyanchya विरोधात निवडणुकीत उभये रवतात, ह्या कसा काय बुवा ????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version