Home टॉप स्टोरी नेस अंगावर जळत्या सिगारेट टाकायचा – प्रिती

नेस अंगावर जळत्या सिगारेट टाकायचा – प्रिती

1

माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियावर विनयभंगाचे आरोप करणारी बॉलिवुड अभिनेत्री प्रिती झिंटाने पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुन्हा एकदा नेस वाडियावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई – माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियावर विनयभंगाचे आरोप करणारी बॉलिवुड अभिनेत्री प्रिती झिंटाने पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुन्हा एकदा नेस वाडियावर गंभीर आरोप केले आहेत.

नेस माझ्या अंगावर जळत्या सिगारेटी टाकायचा. मला खोलीमध्ये कोंडून ठेवायचा. माझ्याबरोबर तो अतिशय आक्रमक आणि हिंसकपणे वागायचा. त्याने माझ्या चेह-यावर जळत्या सिगारेटी टाकल्या. मला मारहाण केली. मी हे सर्व सहन केले. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरील ३० मे च्या घटनेनंतर मला नेस विरोधात पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागली असे प्रितीने राकोश मारिया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

परदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी प्रितीने ३० जून रोजी राकेश मारिया यांची भेट घेतली. त्यावेळी तिने हे पत्र राकेश मारिया यांना दिले. नेस वाडियाला माझ्यापासून दूर ठेवा तरच मी शांततेने जगू शकेन. अन्यथा एक दिवस रागाच्या भरात नेस मला मारुन टाकेल. त्याच्या या स्वभावाची मला प्रचंड भिती वाटते असे प्रितीने या पत्रात म्हटले आहे.

पोलिसात तक्रार दाखल करुन, वाडिया यांचे नुकसान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण स्वत:च्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे येण्यावाचून माझ्यासमोर कोणताही दुसरा पर्याय राहिलेला नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नेस मला भविष्यात धोका पोहोचवू शकतो असे प्रितीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

१२ जून रोजी प्रितीने नेस विरोधात मरिन लाईन्स पोलिस स्थानकात विनयभंगाची, मारहाणीची आणि धमकावण्याची तक्रार दाखल केली होती. ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरु असताना, प्रिती आणि नेसमध्ये वादावादी झाली होती. दोघेही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक आहेत. नेस वाडियाने प्रितीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version