Home देश पंतप्रधान कार्यालयात किरकोळ आग

पंतप्रधान कार्यालयात किरकोळ आग

1

पंतप्रधानांच्या दक्षिण ब्लॉकमधील कार्यालयात मंगळवारी सकाळी ६.२५ मिनिटांनी आग लागली होती.

नवी दिल्ली- पंतप्रधानांच्या दक्षिण ब्लॉकमधील कार्यालयात मंगळवारी सकाळी ६.२५ मिनिटांनी आग लागली होती. पंतप्रधान कार्यालयातील तळमजल्यावरील एका खोलीत ही आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली.

कम्प्युटरच्या युपीएसमधून मोठ्या प्रमाणावर धूर आल्याने पंतप्रधान कार्यालयातील स्मोक डिटेक्टर यंत्रणा कार्यान्वित झाली. धोक्याची घंटा वाजू लागली. त्यामुळे तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले.

आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या अधिका-यांना यश आले. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिका-यांनी सांगितले. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सहा- सात गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी काही मिनिटांतच या आगीवर नियंत्रण मिळवले, असे दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक ए. के. शर्मा यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version