Home देश पनामा पेपर्सबद्दल मोदी गप्प का?

पनामा पेपर्सबद्दल मोदी गप्प का?

1

गभरात गाजत असलेल्या पनामा पेपर्सबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

कामलपूर (आसाम) – जगभरात गाजत असलेल्या पनामा पेपर्सबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. निवडणुकीच्या प्रचारसभेत मोदी यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या मुलाचे नाव ‘पनामा पेपर्स’ आले असून त्याची चौकशी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

आसाम निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या की, पनामा पेपर्स जगभरात जाहीर झाले. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्र्यांचा मुलगा अभिषेक सिंग याचेही नाव आहे. अभिषेक अकाऊंट पनामात आहे. निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी परदेशातून मायदेशी काळा पैसा आणण्याचे मोठे आश्वासन दिले होते. आता रमणसिंग यांच्या मुलाची चौकशी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. आयपीएलचा माजी प्रमुख ललित मोदीला भारतात का आणले जात नाही, असा सवाल आपण संसदेत मोदींना केला होता.

मात्र, मोदी यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मल्ल्या परदेशात पळण्यापूर्वी त्याने अर्थमंत्री अरुण जेटलींची संसदेत भेट घेतली होती, असा आरोप त्याने केला. काळा पैसा असणा-यांवर मोदी सरकार कारवाई करत नाही, अशी टीका करून गांधी म्हणाले की, जेटली यांनी नुकतीच काळा पैसा पांढरा करण्याची योजना जाहीर केली. गुंड, अंमली पदार्थाचे माफिया यांनी सरकारला थोडा पैसा भरून तो स्वच्छ करण्याची योजना होती. मोदी यांनी परदेशातून मायदेशी काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याची घोषणा केली होती. त्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल केला.

1 COMMENT

  1. यांच्याकडे आता काही पॉईण्ट नाहीत म्हणून हा वायफळ बडबड करीत आहे, तुमचे राज्य असताना देशातील सर्वात मोठा २ G स्पेक्टूम घोटाळा, कोयला घोटाळावाल्यांचे काय केले?..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version