Home क्रीडा पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये हिंसाचार

पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये हिंसाचार

1

संपूर्ण फुटबॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यातही अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाला जर्मनीकडून १-० असा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. 

ब्युनोस आयर्स – संपूर्ण फुटबॉल विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाने दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यातही अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाला जर्मनीकडून १-० असा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव अर्जेंटिनाच्या अनेक चाहत्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारला तर, काहींना हा पराभव पचवता आला नाही. 

अंतिम सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. ब्युनोस आयर्समधील ओबीलिस्क चौकात जमलेले फुटबॉल चाहते आपल्या संघाने विश्वचषकात जी मजल मारली त्याबद्दल संघाचे कौतुक करत होते समर्थनाच्या घोषणा देत होते. त्याचवेळी पराभवाने संतप्त होऊन तेथे आलेल्या तरुणांच्या जमावाने हिंसाचाराला सुरुवात केली.

या जमावाने ओबीलिस्क चौकाजवळच्या अनेक दुकानांची तोडफोड करत, पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. अखेर या संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. पोलिसांनी रबरी गोळयांचाही वापर केला. या हिंसाचारात पंधरा पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी चाळीस दंगलखोरांना अटक केली आहे.

ओबीलिस्क चौकात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमण्याची परंपरा आहे. मात्र यावेळी पराभव झाला असला तरी, संघाने उच्चदर्जाचा खेळ केला आहे त्यामुळे फुटबॉल वेडया अर्जेंटिनामध्ये अनेक जण मेसीच्या संघाचे समर्थन करत आहेत. अनेकांना आपल्या संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे मात्र अनेकजण असेही आहेत की, हा पराभव ज्यांच्या जिव्हारी लागला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version