Home टॉप स्टोरी पश्चिम रेल्वेची सेल्फ बुकिंग सुविधा

पश्चिम रेल्वेची सेल्फ बुकिंग सुविधा

1

एकगठ्ठा तिकीट आरक्षण आणि दलालांच्या चालाखीमुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा तिकीट खिडक्यांवरही आरक्षित तिकीट मिळत नाही. 

मुंबई – एकगठ्ठा तिकीट आरक्षण आणि दलालांच्या चालाखीमुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा तिकीट खिडक्यांवरही आरक्षित तिकीट मिळत नाही. आधीच रांग अडवून गटागटाने उभ्या राहणा-या दलालांमुळे खरे प्रवासी मात्र ‘कन्फर्म’ तिकिटांपासून वंचित राहतात. दलालांची ही साखळी तोडून प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्यांना प्राधान्याने तिकीट देण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने ‘सेल्फ अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंग’चा पर्याय उपलब्ध केला आहे.

[poll id=”552″]

सकाळी ८ ते ९.४५ या कालावधीत सेल्फ अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध असेल. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील २५ स्थानकांमध्ये सेल्फ बुकिंग प्रणाली राबवण्यात येईल. त्यात मुंबई विभागातील १७ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्थानकांतील क्रमांक १ ते ५ या खिडक्यांवर सकाळी केवळ सेल्फ बुकिंगअंतर्गतच तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे रांगेत गर्दी करून तिकीट मिळवणा-या दलालांना चाप बसणार आहे.

१३ फेब्रुवारी ते १० एप्रिल ही योजना सुरू राहील. चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही सुविधा अन्य स्थानकांवरही राबवून या सुविधेचा कालावधी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पहाटेपासून तिकीट खिडक्यांवर ठाण मांडून तिकिटे घेणा-या दलालांना यामुळे चाप बसेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी व्यक्त केला.

या योजनेच्या माध्यमातून आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना आरक्षण अर्जासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. सोबत ओळखपत्रही दाखवणे गरजेचे राहणार आहे.

या स्थानकांवर मिळेल आरक्षण
चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, मिरा रोड, भाईंदर, वसई रोड, विरार, पालघर, बोईसर, डहाणू रोड

1 COMMENT

  1. Good bigining. The success of the scheme will depend on identification source. P.A.N. card/ Adhar card/ Passport/ Govt.identity card, school-college ID card can fulfil this requirement.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version