Home संपादकीय तात्पर्य पालकांनो मुलांवर दडपण आणू नका!

पालकांनो मुलांवर दडपण आणू नका!

1

शैक्षणिक ताणतणावामुळे तरुण, तरुणींचे आत्महत्या होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या तणावाला पालक आणि सध्याची परिस्थिती कशी कारणीभूत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

शैक्षणिक ताणतणावामुळे तरुण, तरुणींचे आत्महत्या होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या तणावाला पालक आणि सध्याची परिस्थिती कशी कारणीभूत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता लवकरच १० वी, १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागणार आहे. पालकांनी अवास्तव अपेक्षा टाकल्याने आणि त्या पूर्ण करण्यात अपयश आल्याने अनेक विद्यार्थी आत्महत्या करण्याकडे वळतात. मात्र अशा घटना होऊच नयेत यासाठी पालकांनी मुलांवर त्याच्या बुद्धीच्या कुवतीनुसार अपेक्षा टाकाव्यात. या अपेक्षांच्या ओझ्याखाली नवीन क्षितीजे पाहण्यात रममाण असलेली तरुणाई सध्या दबली गेली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मुख्यत्वे पालक आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.

आपण डॉक्टर आहोत म्हणून मुलानेही डॉक्टरच व्हावे, असा पालकांचा हेका सध्या वाढला आहे. मात्र त्यावेळी हा विचार करताना मुलांच्या मन:स्थितीचा कोणीही विचार करत नाही. मुलांना काय करायचे आहे, त्याने कोणते क्षेत्र निवडायचे हे त्या मुलाने ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी त्याच्यावर सक्ती करण्याची आवश्यकता नाही. पालकांनी या मुलांचा कल कशाकडे आहे, त्याची ते करण्याची कुवत आहे की नाही, हे ओळखून त्याला अभ्यास करण्यासाठी मोकळा वेळ द्यावा. मुलांवर पालक जेवढा दबाव देतात, तेवढी ही मुले स्वतंत्रपणे, मुक्तपणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांवर कोणतीही बंधने न घालता, त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन वागू दिल्यास ते योग्य निर्णय घेऊ शकतात.

मुलांनी परीक्षेत पहिला क्रमांक मिळविला म्हणजे त्याने जग जिंकले असे कधी होत नाही. खरे तर परीक्षेनंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्यावर त्याची खरी परीक्षा सुरू होते. समाजाच्या प्रवाहासोबत वाहत जाण्याऐवजी त्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद पालकांनी देण्याची गरज आहे. तरच तो समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. यासाठी पालकांनी मुलांना पाठीवर हात ठेवून फक्त लढ असे म्हणायची गरज आहे. पालकांनी पाठिंबा दिल्यास मुलांना कोणतेही यश दूर नसते, हे अनेक आयएएस, आयपीएस अधिका-यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सध्याची अनेक मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. या परीक्षेला २ ते ३ लाख मुले आपली क्षमता पणाला लावतात. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे काही नाही. अशावेळी मुलाच्या पालकांनी या मुलांना भरपूर पाठबळ दिले पाहिजे. तरच ही मुले या मोठय़ा परीक्षेत यशस्वी होतीत. मात्र प्रत्येकवेळी पालकांनी तू असेच केले पाहिजे, अमुक एका मुलाला तुझ्यापेक्षा कमी वयात नोकरी लागली असे मुलांना वारंवार सांगून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याची गरज नाही. अन्यथा नंतर मुलाने आत्महत्या केली म्हणून हळहळण्यात काही अर्थ नाही.

1 COMMENT

  1. लेख अत्यंत चांगला आहे. माझे मुले लहान आहे. मी नेहमी मुले संस्काराचा वाचन करीत असतो. धन्य वाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version