Home टॉप स्टोरी हॅटट्रिक करणार!

हॅटट्रिक करणार!

1

मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता फेटाळून लावत, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेवर निवडून येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली- मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता फेटाळून लावत, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेवर निवडून येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते शनिवारी राष्ट्रीय प्रसारमाध्यम केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर सोनिया गांधी वार्ताहरांशी बोलत होत्या. ‘आम्ही जनतेला माहितीचा अधिकार मिळवून दिला. शिक्षणाचा अधिकार दिला आणि आता अन्नाचा अधिकार दिला आहे. जनतेला दिलेले हे अधिकार हाच आमच्या विजयाचा पाया आहे,’ असे त्यांनी सांगितले.

अन्न सुरक्षा विधेयक आणि भूसंपादन विधेयक यांसारखी ऐतिहासिक विधेयके संमत झाल्यावर काँग्रेस पक्ष मुदतीआधी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार का, असे वार्ताहरांनी विचारले असता, सोनिया गांधी यांनी ही शक्यता ठामपणे फेटाळली. कोणत्याही परिस्थितीत मुदतीआधी निवडणुका घेण्याचा आमचा विचार नसून या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रेंगाळलेले अन्न सुरक्षा विधेयक पुढील आठवडयात संमत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विधेयकाच्या मंजुरीसाठी भाजप सहकार्य करेल का, अशी विचारणा केली असता, त्याबद्दल आपण कसे काय सांगू शकतो, असा प्रतिप्रश्न गांधी यांनी केला.

पंतप्रधानांचा प्रसारमाध्यमांना सल्ला

शोधपत्रकारिता करताना त्या चौकशीमुळे एखाद्यावर विनाकारण बालंट येणार नाही आणि बदनामी होणार नाही, याची काळजी प्रसारमाध्यमांनी घेतली पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या उद्घाटन करताना दिला. प्रसारमाध्यमे ही केवळ व्यावसायिक घडामोडींचा आरसा नसून ती संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

1 COMMENT

  1. अगधी लवचिक प्रश्न

    संतांची परंपरा आणि महापुरुषांच्या विचारांचा वारस म्हणून देशातील अन्य राज्ये महाराष्ट्राकडे पाहत असतात. पण “जय महाराष्ट्राचे भय महाराष्ट्र” अशी ओळख सध्या निर्माण होत आहे. या मागचं कारण हे कि गेल्या तीन चार दिवसापासून प्रत्येक दिवशी नवीन भय महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे भरदिवसा होणारा नरेंद्र दाभोळकरांचा खून आणि खुनी अजूनही मोकाठ, तर दुसरीकडे मुंबई मध्ये महिला पत्रकारावर झालेला बलात्कार ह्या दोन्ही गोष्टी मुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शिरच्छेद तर झालाच पण कायदा आणि सुव्यवस्थेचा अगधी लवचिक प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version