Home महामुंबई प्रवासी व बेस्ट बसवाहकांत चिल्लर वाद!

प्रवासी व बेस्ट बसवाहकांत चिल्लर वाद!

1

प्रवासी व बेस्ट बसवाहकांत होणारे वाद काही नवीन नाहीत, मात्र आता या वादात सुट्टया पैशांवरून होणा-या वादामुळे अधिकच भर पडली आहे.

मुंबई – प्रवासी व बेस्ट बसवाहकांत होणारे वाद काही नवीन नाहीत, मात्र आता या वादात सुट्टया पैशांवरून होणा-या वादामुळे अधिकच भर पडली आहे. बेस्टच्या तिकिटात एक रुपयाने वाढ झाल्याने प्रवाशांना सहा रुपयांऐवजी सात रुपये मोजावे लागतात. प्रवाशाने १० रुपयांची नोट दिल्यास त्याला परत देण्यासाठी ३ रुपये सुट्टे द्यावे लागतात, मात्र वाहकांकडे चिल्लरची कमतरता असल्याने प्रवासी व बेस्ट बस वाहकांत खटके उडत आहेत.

बेस्टच्या ताफ्यात ४,२३५ बस असून, ४० लाख प्रवासी रोज प्रवास करतात. बेस्ट तोटयात असल्याची आेरड करून प्रशासनाने भाडेवाढ क३त प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. १ फेब्रुवारीपासून लागू झालेली एक रुपयांची भाडेवाढ व १ एप्रिलपासून लागू होणारी एक रुपयांची भाडेवाढ यामुळे प्रवाशांत प्रचंड नाराजी आहे. बेस्टच्या तिकिटात एक रुपयाने वाढ केल्याने बेस्ट प्रशासनाला प्रवाशांच्या नाराजीला समोरे जावे लागत आहे. प्रवाशांच्या नाराजीचा फटका प्रशासनाबरोबर बसवाहकांना चिल्लरच्या माध्यमातून सहन करावा लागतो. बस भाडेवाढ करण्याआधी चिल्लरचा प्रश्न सोडवला असता, तर प्रवासी व बस वाहकांतील भांडणाला आळा बसला असता, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी बेस्ट बसवाहक व प्रवाशांत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद रंगत होते. सुट्टया पैशांचा वादही नवा नाही. मात्र बेस्ट परिवहन विभागाने नव्याने भाडेवाढ सात रुपयांपर्यंत नेल्याने प्रवासी व वाहकांतील वाद अधिकच वाढताना दिसत आहेत. ७ रुपयांच्या तिकिटासाठी प्रवासी १० व २० रुपयांची नोट काढतो आणि प्रवासी व वाहकांत वाद निर्माण होतो.त्यामुळे बेस्ट परिवहन विभागाने सर्वप्रथम चिल्लरवर उपाय शोधून, प्रवासी व वाहकांत होणा-या वादावर पडदा पाडावा, अशी मागणी कर्मचारी व प्रवाशांनी केली आहे.

1 COMMENT

  1. बेस्ट म्हणजे त्यात कंडक्टर आलेच भले त्यांना तिकीट देण्यापासून,पैसे मोजण्यापर्यंत आणि चालकास मार्ग दाखवण्यापर्यंत सर्व काम म्हणजे क्लार्क,क्याशीयर (Cashier) आणि त्यांना दिलेले काम म्हणजे आपल्या बस थांब्यावर बस थांबवण्यास मारण्यात आलेली घंटी. जर एखाद वेळेस प्रवाशी घाईत असेल आणि त्याच्या जवळ सुट्टे पैसे नसतील तर त्याने प्रवाशास सुट्टे पैसे देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अशा वेळेस जर त्याने सुट्टे पैसे देण्यास नकार दिला तर प्रवाशांनी त्यांच्या दोन थोबाडीत मारावी, नाहीतर राजकीय पक्षाच्या मदतीने बसची तोडफोड वगैरे करावी आणि सुट्टे पैसे न देणाऱ्या कंडक्टरला कामावरून काढून टाकण्यास तीव्र आंदोलन करावे. कित्येक वेळेस कामावर जाणाऱ्या प्रवाशांना अडवणूक व्हावी म्हणून हे सरकारी कर्मचारी अशी टाळाटाळ करतात. पगार घेताना यांना लाज कशी वाटत नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version