Home देश फेसबूक वापरणा-या जवानांसाठी नियमावली

फेसबूक वापरणा-या जवानांसाठी नियमावली

1

फेसबूक वापरणा-या जवानांवर, आधिका-यांवर आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सोशल मिडियाच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चंदीगड- फेसबूक वापरणा-या जवानांवर आता लष्कराने इशारा दिला आहे. लष्करामधील अधिकारी व जवान आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सोशल मिडियाच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हवाई दलामधील जवान रणजित के के याला एका हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही नियमावली काढण्यात आली आहे.

या नियमावलीमध्ये फेसबुकवर अश्लील छायाचित्रे वा व्हिडिओ न पाहण्याचे; तसेच अज्ञात लोकांकडून आलेल्या “फ्रेंड रिक्वेस्ट‘ न स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले.  फेसबुकवरील एखादी  अज्ञात फ्रेंड किंवा अश्लील छायाचित्र लष्कराची संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेला सापळा असू शकतो, असा इशारा या नियमावलीद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, हवाई दलमधील जवान रणजित के के याला गेल्या आठवड्यात फेसबुकवर सुंदर छायाचित्र असलेल्या एका महिलेस भारतामधील हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत ताब्यात घेण्यात आले.  रणजित याला ब्रिटनमधील पत्रकार वाटलेली ही महिला प्रत्यक्षामध्ये एका परकीय गुप्तहेर खात्याशी संबंधित होती.

या नियमावलीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत.

»  सोशल मिडियावर अश्लील संकेतस्थळे, छायाचित्रे पाहु नये,

»  लष्कराच्या गणवेशामधील आणि शस्त्रासहित काढलेली छायाचित्रे सोशलमिडियावर प्रसिद्ध करु नये

»  लष्करामधील औपचारिक ओळख जाहीर करु नये

»  लष्करामधील जवानांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करू नये

»  संगणकवर लष्कराशी संबंधित कोणतीही माहिती साठवून ठेवू नये

»  बक्षिसाची लालुच दाखविणा-या जाहिरातींच्या संकेतस्थळांस भेट देऊ नये.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version