Home मध्यंतर वास्तू वेध फ्लॅट खरेदी करताय? सावधान!

फ्लॅट खरेदी करताय? सावधान!

2

घर खरेदी करताना आपण सर्वसामान्य नागरिक बँकेकडून लोन काढतो. मग ते लोन फेडताना व्याजासहित पैसे परत द्यावे लागतात. म्हणूनच फ्लॅट घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. कित्येकदा फ्लॅट खरेदी करताना बरीच प्रलोभनं दाखवली जातात. त्या प्रलोभनांना लोक बळी पडतात. म्हणूनच फ्लॅट खरेदी करताना काही कायदेशीर बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

बिल्डर वेळेवर फ्लॅट तयार करून देऊ शकत नसेल तरीही घेणा-याला व्याजासहित पैसे परत करावे लागतात. म्हणूनच काही काळजी घेणे आवश्यक आहे. याविषयीच्या काही कायदेशीर बाबींचा विचार करू या.

»  फ्लॅट खरेदी करताना अलॉटमेंट लेटरची प्रत संबंधित अ‍ॅथॉरिटीच्या हाऊसिंग डिपार्टमेंटकडून तपासली जाणं आवश्यक आहे.

»  बिल्डरची माहिती पूर्ण काढूनच मग त्यात फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करावा.

»  नवीन बिल्डरकडून प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्यांनी केलेलं प्रोजेक्ट आवश्य पाहावं. तिथल्या कर्मचा-यांशी चर्चा करा. साईटवरील कामगारांशी चर्चा करा. किती वेळ लागेल याची चौकशी करा. इतकंच नाही तर कंपनीची बॅलेन्सशीटही तपासावी. जेणेकरून त्या कंपनीच्या वित्तीय स्थितीचा अंदाज येईल.

»  कोणताही बिल्डर ग्राहकाकडून फ्लॅटची पूर्ण किंमत रोख पैशाच्या स्वरूपात वसूल करू शकत नाही. चेकचा वापर करणंही आवश्यक असतं.

»  प्रॉपर्टीविषयक अत्यावश्यक कागदपत्रं अवश्य बघावीत.

»  प्रॉपर्टीच्या मालकाला रजिस्टरच्या कागदावर त्यांचा फोटो लावणं अनिवार्य आहे.

»  बिल्डर आणि ग्राहक यांच्यात एक अट असते की बिल्डर निर्धारित वेळेपेक्षा फ्लॅट द्यायला वेळ लागत असेल तर निर्धारित वेळेनंतर ग्राहकाला त्याने भाडं देणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे बिल्डरने ऑफर लेटर दिल्यावरही ग्राहक त्याचं अकाउंट क्लिअर करू शकत नसेल तर ग्राहकाला बिल्डरला दंड द्यावा लागतो. किंवा ग्राहकाचा फ्लॅट तो थांबवू देखील शकतो.

»  प्रलोभनांना बळी पडू नका, कारण कित्येकदा बिल्डरने ज्या परिसरात इमारत बांधली आहे त्या परिसरात पाण्याचे किंवा अन्य कोणत्या प्रकारच्या समस्या असण्याचा धोका असतो. म्हणूनच आधी आसपासच्या परिसरात चौकशी करा. तिथे पाणी, वीज आदी गोष्टींची चौकशी करा. तसंच कित्येकदा अनधिकृत बांधकामांनादेखील तुम्ही बळी पडू शकता, तेव्हा सावधानता बाळगा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.

2 COMMENTS

  1. pan jar ekhdya froud builder karvi fasgat jhali asel tar swatache paise parat milvinyasathi kaay karave hyababtit krupya madat करावी
    karan ashya cases madhye police hi complaint lihin ghet nahit…jene karun hya aslya pravruttiche favte…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version