Home देश बंगळूरुत तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

बंगळूरुत तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

1

बंगळूरुमध्ये एका खासगी शाळेमध्ये शिकणा-या तीनवर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बंगळूरु – बंगळूरुमध्ये एका खासगी शाळेमध्ये शिकणा-या तीनवर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळूरुमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची मागच्या चार महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

पालकांना या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी सकाळी शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली. पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय ओळखून वेगाने तपास सुरु केला असून, या बलात्कारामध्ये शाळेतील व्यक्तीचा सहभाग आहे.

पोलिस शाळेतील कर्मचा-यांची कसून चौकशी करत आहेत. पोलिस शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. जलहाली पोलिस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीला आई शाळेतून नेण्यासाठी आली तेव्हा ती रडत होती. तिचे वागणे सामन्य नव्हते. तिच्यामध्ये ताप आल्याची लक्षणे दिसत होती.

सुरुवातीला तिने आईला आपल्याला कोणीतरी मारल्याचे सांगितले. त्यानंतर आईने अधिक विचारणा केली असता, या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलीच्या पालकांनी मंगळवारी रात्रीच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version