Home देश बीसएफच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी घुसखोर ठार

बीसएफच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी घुसखोर ठार

0

हेरॉईनची स्मगलिंग करणा-या दोन पाकिस्तानी संशयित घुसखोर रविवारी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत ठार झाले.

अमृतसर– हेरॉईनची तस्करी करण्यासाठी भारतीय हद्दीत घुसऱोखीचा प्रयत्न करणा-या दोन पाकिस्तानी घुसखोरांना सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात यश आले.  ६० कोटी रुपयांच्या हेरॉईनची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.

या दोघांकडून एके रायफल तसेच १२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती सैन्याचे अधिकारी आर. पी. एस जसवाल यांनी दिली. घुसखोरी करणा-या दोन्ही घुसखोरांना सुरक्षा रक्षकांनी शरण येण्यास सांगितले होते, मात्र त्यास त्यांनी नकार दिला.

यावेळी घुसखोरांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी जवानांनी घुसखोरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यामध्ये हे दोघेही ठार झाल्याचे जसवाल यांनी सांगितले. या दोन्ही घुसखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

शनिवारीच अमृसरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील अंजाला गावाजवळ २४ किग्रँची स्मगलिंग करणा-या एका पाकिस्तानी स्मगलरला जवानांनी ठार केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version