Home विदेश बेपत्ता विमानाची शोधमोहीम मेनंतर बंद

बेपत्ता विमानाची शोधमोहीम मेनंतर बंद

1

हिंदी महासागरातील निमर्नुष्य टापूत आंतरराष्ट्रीय शोध पथकांद्वारे बेपत्ता ‘एमएच-३७०’ या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचा अथक शोध सुरू आहे.

क्वालांलपूर- हिंदी महासागरातील निमर्नुष्य टापूत आंतरराष्ट्रीय शोध पथकांद्वारे बेपत्ता ‘एमएच-३७०’ या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचा अथक शोध सुरू आहे. विमानाचा काहीतरी थांगपत्ता लागेल या आशेवर दिवसाचे १२-१२ तास पथक राबत आहे.

मात्र, अजूनही या प्रयत्नांना यश येत नसल्याने या पथकाचा संयम सुटू लागला आहे. मात्र, या टापूत मेपर्यंत हवामान साथ मिळेल. त्यानंतर ही शोधमोहीम सुरू ठेवणे अशक्य असल्याचे मलेशियाचे वाहतूकमंत्री लिओ तिआँग लाई यांनी सांगितले.

क्वालांलपूरहून बीजिंगला जाणारे ‘एमएच-३७०’ हे विमान गेल्यावर्षी ८ मार्चला वाटेतच बेपत्ता झाले. या विमानातील २३९ प्रवाशांचाही कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. लाई म्हणाले की, या विमानाच्या शोधासाठी हिंदी महासागराचा ६० हजार चौरस किलोमीटरचा भाग प्राधान्यतत्त्वावर ठरवण्यात आला.  या विमानाचे अवशेष सापडतील अशी आशा आहे. या शोधपथकात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनाही हेच वाटते.

1 COMMENT

  1. अरे गाढवानो ! विमान बांधताना ( तयार करताना ) शेपटा कडील भागात एका कप्प्यात एक ग्यास भरलेला फुगा मजबूत धाग्यासह
    बांधला गेला असता तर आणीबाणी च्या प्रसंगात तो फुगा आपोआप विमानाचे बाहेर पडून आकाशात तरंगत राहिला असता,जेणे
    करून पाण्यात बुडालेल्या विमानाचा थांग पत्ता तरी लागला असता, !!!! ( एक सुपर्ब खोपडी ),?????✈️✈️✈️✈️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version