Home विदेश ‘बेबी’वर पाकिस्तानात बंदी

‘बेबी’वर पाकिस्तानात बंदी

1

दहशतवादावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा ‘बेबी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातल्याने पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

इस्लामाबाद – दहशतवादावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा ‘बेबी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातल्याने पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

‘बेबी’ चित्रपटात मुस्लिम नागरिकांविषयीची नकारात्मक बाजू दाखवण्यात आली आहे तसेच नकारात्मक भूमिका साकारणा-या पात्रांना मुस्लिम नावे देण्यात आल्याचे सांगत इस्लामाबाग आणि कराची येथील सेन्सॉर बोर्डाने बंदी घातल्याची माहिती डॉन वृत्तपत्राने दिली. इस्लमाबादमध्ये या चित्रपटाच्या सर्व सीडी आणि डीव्हीडीजवरही बंदी घालण्यात आली आहे.

नीरज पांडे दिग्दर्शित अक्षय कुमारचा बेबी हा चित्रपट संपूर्ण देशात आज प्रदर्शित झाला. चित्रपटात अक्षय कुमारसह के.के. मेनन, अनुपम खेर, राणा दग्गुबत्ती, डॅनी डेंझोगप्पा यांच्याही भूमिका आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version