Home टॉप स्टोरी ब्रिटनमध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत

ब्रिटनमध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत

1

ब्रिटनमध्ये पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखाली कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने या निवडणुकीत बहुमत मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे.

लंडन –ब्रिटनमध्ये पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखाली कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने या निवडणुकीत बहुमत मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे.

शुक्रवारी झालेल्या मतमोजणीदरम्यान हाऊस ऑफ कॉमन्सच्या सर्व ६५० जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात कन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाने सर्वाधिक ३३१, लेबर पक्षाने २३२, स्कॉटिश नॅशनल पार्टीने (एसएनपी) ५६, लिबरल डेमोक्रॅटिकने ८ आणि अन्य उमेदवारांनी २३ जागांवर विजय मिळवला.

मतदानानंतर विविध सर्वेक्षण चाचण्यांमध्ये कन्झरर्व्हेटिव्ह पक्ष सत्ता अबाधित राखेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सर्वेक्षण चाचण्यांमध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३१६ तर, लेबर पक्षाला २३९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मात्र या अंदाजापेक्षाही अधिक जागा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने मिळवल्या आहेत. मतदारांनी पुन्हा एकदा कॅमेरुन यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.  निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते निक क्लेग यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

लेबर पक्षाला स्कॉटलंडमध्ये स्कॉटिशन नॅशनल पार्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्कॉटिश नॅशनल पार्टीने स्कॉटलंडमधील ५९ जागांपैकी तब्बल ५६ जागांवर विजय मिळवला.

युनायटेड किंगडमच्या संसदेमध्ये ६५० जागा आहेत. त्यातील ५३३ मतदारसंघ इंग्लंडमध्ये, ५९ स्कॉटलंडमध्ये, वेल्समध्ये ४० आणि उत्तर आयर्लंडमध्ये १८ जागा आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version