Home देश ‘भगवद्गीते’च्या संदर्भात पेटला वाद

‘भगवद्गीते’च्या संदर्भात पेटला वाद

1

भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळावी, असे वक्तव्य रविवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
दिल्ली/नागपूर- भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळावी, असे वक्तव्य रविवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. या वक्तव्यावरून देशात वाद निर्माण झाला आहे. एका ग्रंथाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्यास अन्य ग्रंथांचे काय करायचे असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. त्याचबरोबर हा प्रकार धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने त्याला विरोध दर्शवला आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी एका कार्यक्रमात भगवद्गीतेला ‘राष्ट्रीय ग्रंथ’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. त्यावर कॉँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले की, या मताशी आपण सहमत नाही. एका ग्रंथाला पवित्र ठरवल्यास अन्य ग्रंथांना कोणता दर्जा देणार असा प्रश्न त्यांनी केला. मी हिंदू आहे. हिंदूंमध्ये एकच पवित्र ग्रंथ नाही. गीतेला महत्त्व दिल्यास वेद व उपनिषदांचे काय करायचे ? असा सवाल त्यांनी केला.

भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ असून त्याचे राष्ट्रीय महत्त्व आहे. मग तुम्ही कुराण आणि बायबलला हाच निकष लावणार का? कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे, असे समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी सांगितले.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देणे धर्मनिरपेक्षतेविरोधी आहे. माझ्या धर्माच्या मोठय़ा परंपरेचा अभिमान आहे. परंतु, मला अन्य धर्मियांच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही. देशात सर्व धर्म समान आहेत. भाजपा अन्य धर्मातील लोकांना डिवचण्याचे काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

1 COMMENT

  1. Sushma swaraj ya manyavar BJP chya mantri aahe tyani shalet he paath vachle nasave nagrikshatracha tyani jara aabhyas karava kaaran bharat he ek Dharmanirpeksha rajya aahe eethe saglya dharmachi manse sthyaik aahe , kona ekala kami lekhun dusryala motha karaycha mhanje bakichyanvar aanyay karnaysarkh hooil.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version