Home टॉप स्टोरी भाजपसमोर गुडघे टेकले

भाजपसमोर गुडघे टेकले

1

सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेने भाजपसमोर अक्षरश: गुडघे टेकले असून नव्या सरकारच्या पहिल्या विशेष अधिवेशनापूर्वी आपल्याला सत्तेत सामावून घ्यावे, अशी याचना केली आहे.

मुंबई- सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेने भाजपसमोर अक्षरश: गुडघे टेकले असून नव्या सरकारच्या पहिल्या विशेष अधिवेशनापूर्वी आपल्याला सत्तेत सामावून घ्यावे, अशी याचना केली आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि १० मंत्रीपदे असे दान मागण्यासाठी पुन्हा दिल्लीवारी करणारे शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना भाजपने हात हलवत परत पाठवले आहे.

भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना अगदीच घायकुतीला आली असून काहीही करून सत्तेत सहभागी होण्याची केविलवाणी धडपड शिवसेनेने सुरू केली आहे. राज्यातील भाजप नेतृत्व दखल घेत नसल्याचे पाहून शिवसेनेचे दोन देसाई दोन वेळा दिल्लीला गेले. महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताव रुडी यांच्यासमोर त्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या. भाजप सरकारमध्ये एकतृतियांश मंत्रीपदे आणि उपमुख्यमंत्रीपद मिळावे असा आग्रह धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुख्य म्हणजे हा निर्णय नव्या सरकारच्या पहिल्या विशेष अधिवेशनापूर्वी व्हावा, अशी

काकुळतीची विनंती शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे भाजपने गांभीर्याने पाहिले नाही. मंत्रिपदाबाबतचर्चा करण्याची तयारी भाजपची असली तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठींनी नकार दिला आहे.

महाराष्ट्रात आलेले सरकार हे केवळ भाजपचे आहे, हा संदेश द्यायचा असल्याने कुणाचाही त्यात ठळक सहभाग दिसणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले तर हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे, असा उल्लेख होईल.

सरकार भाजपचेच आणि शिवसेना ही कायम याचकाच्या भूमिकेत राहील, अशी खबरदारी घेतली जात असून त्याचाच भाग म्हणून शिवसेनेला भाजपने अद्याप प्रतिसादाविना लटकत ठेवले आहे. आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, विरोधी पक्षनेत्याची निवड या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन येत्या ११, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी शिवसेनेने त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी व्हावा, असा आग्रह धरला आहे. मात्र त्यालाही भाजपने फारसा प्रतिसाद
दिलेला नाही. सत्तेसाठी लाचार होण्यापेक्षा सत्तेवर लाथ मारणा-या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेचे नवे नेते सत्तेत जाण्यासाठी लाचार होताना पाहून स्वाभिमानी शिवसैनिक दुखावले आहेत.

1 COMMENT

  1. ६३ आमदारांचे १८० लवकरच करणार…….. शिवसेनेची ची मती कुंठीत झाली आहे . शिवाबाई भुकेने अगतिक आहेत.भात तर भात , वरण असेल तर वरण , मीठ भाकर पण चालेल. तूप नकाे पण पंगतीत बसवा. रखेल चा तरी माान देणे . गणपत वाणी बिड़ी पितांना चावायचा नुसतिच काडी ।
    अन् वदायचा मनाशी या जागेवर बांधिन माडी । ………….. नपंूसक मंदिरातून डराॅंव, डराॅंव कर्तार ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version