Home टॉप स्टोरी भाजपा-शिवसेनेमध्ये व्यंगचित्र युद्ध

भाजपा-शिवसेनेमध्ये व्यंगचित्र युद्ध

1

मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपा-सेना या दोन्ही पक्षांनी केल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये घोषणायुद्ध जोरदारपणे सुरू झाले आहे.

मुंबई- मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपा-सेना या दोन्ही पक्षांनी केल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये घोषणायुद्ध जोरदारपणे सुरू झाले आहे.

प्रत्येक दिवशी शिवसेना आणि भाजपा एकमेकांचे कपडे फाडण्याचे काम करीत आहेत.

मेट्रो-३ ला शिवसेनेने विरोध केल्यानंतर भाजपातर्फे आज प्रसारित करण्यात आलेल्या तीन व्यंगचित्रांत भाजपाने शिवसेनेची जोरदापणे खिल्ली उडवली आहे.

औरंगाबाद येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ‘रोखठोक’ नेत्याने भाजपाचा ‘बाप’ काढल्यानंतर वातावरण आणखी चिघळले असून, वाघाचे कातडे पांघरून टीका करणे हे शिवसेनेचे काम आणि भारताचा दरारा ठेवणे हे वाघाच्या काळजाचं काम.. असे मोदींचे समर्थन करणारे आज दिवसभर वॉट्सअ‍ॅपवर फिरत होते.

सेनेचे नेते भाजपला ‘निजामाचा बाप’ म्हणतात. तर भाजपचे नेते सेनेवाल्यांना औरंगजेब म्हणतात… महाराष्ट्रात युतीची सत्ता आलीय की मोगलांची? – नितेश राणे

शिवसेनेने मेट्रो-३ ला जोरदार विरोध केल्यानंतर हे व्यंगचित्र आणि पोस्टर युद्ध अधिक आक्रमकपणे सुरू झाले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत आता हे पोस्टरयुद्ध आणि व्यंगचित्रयुद्ध चालणार असून, निवडणुकीनंतर मात्र पुन्हा गळय़ात गळे घातले जाण्याचीच चर्चा असून, त्यावर मात्र कोणतेही व्यंगचित्र अजून प्रसारित करण्यात आलेले नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version