Home क्रीडा पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचा पराभव

पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचा पराभव

1

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा १२४ धावांनी पराभव झाला. या विजयासह पाहुण्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

कोची- वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीकरत उभा केलेल्या ३२१ धावांच्या लक्ष्याचा डोंगर भारतीय संघाला पेलला नाही. भारताचा डाव १९७ धावांवर संपुष्ठात आला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्यात शतक झळकावणा-या मार्लन सॅम्युएल्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 वेस्ट इंडिजने दमदार फलंदाजी करत विजयासाठी यजमान भारतासमोर ३२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय डावाची सुरुवात अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. रहाणे २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहलीही दोन धावा करुन बाद झाला. कोहलीबाद झाल्यानंतर आलेल्या सर्व भारतीय फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. भारताकडून धवनने सर्वाधीक ६८ धावा केल्या.

त्याआधी तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सहा बाद ३२१ धावा केल्या. त्यांच्याकडून मार्लन सॅम्युएल्सने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या तर त्याला सुरेख साथ लाभली ती रामदिनची. रामदिनने ६१ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडिजची सुरुवात समाधानकारक झाली. ३४ धावा झाल्या त्यावेळी वेस्ट इंडिजचा ड्वायेन ब्राव्हो बाद झाला. त्याला केवळ १७ धावा करता आल्या. त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल करणा-या वेस्ट इंडिज संघाचा ९८ धावांत दुसरा गडी (स्मिथ ४६ धावा) बाद झाला. अवघ्या दोन धावांनी स्मिथचे अर्धशतक हुकले.त्यानंतर डॅरेन ब्राव्हो २८ धावा करुन बाद झाला.  तर केविन पोलार्ड केवळ दोन धावा करुन तंबूत परतला.

भारताकडून मोहम्मद शामी याने सर्वाधिक चार गडी बाद केले. आठ षटके खेळताना ५१ धावांत त्याने चार गडी बाद केले. तर जडेजा आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक गडी बाद केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version