Home टॉप स्टोरी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार

1

भारत आणि जपान या दोन्ही देशात बुलेट ट्रेन आणि अणुकरारासह अन्य महत्त्वपूर्ण करारावर शनिवारी स्वाक्ष-या करण्यात आल्या.

नवी दिल्ली- केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या १५ अब्ज डॉलरच्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनला आशियातील प्रगत राष्ट्र जपान भरभक्कम अर्थबळ दिले आहे.

मुंबई आणि अहमदाबाद मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार असून नेटवर्क उभारणीसाठी भारत आणि जपान यांच्यात शनिवारी ९८ हजार कोटी रुपयांच्या (१२ अब्ज डॉलर) अर्थपुरवठय़ाचा करार झाला.

अर्थपुरवठा जपान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्यातील वार्षिक बैठकीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जपानकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या एकूण खर्जापैकी ८० टक्के अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. ५० वर्षे मुदतीच्या कर्जावर दरसाल ०.१० टक्के व्याजदर आकारले जाईल. प्रत्यक्षात १५ वर्षानंतर कर्जफेडीला सुरुवात होणार आहे.

सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज असून या अतिवेगवान ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद हा ५०५ किमीचा प्रवास अवघ्या तीन तासांत कापता येणार आहे.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. भारताच्या आर्थिक विकासात जपानचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी म्हटले.

भारत आणि जपानमध्ये अणुऊर्जेच्या शांततापुर्ण उपयोगावरही एकमत झाले असून याबाबत सहकार्य करार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान हा भारताच्या विकासात मोठा भागीदार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. भारत आणि जपानमध्ये संयुक्त युध्दाभ्यास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची लवकरच पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे मत जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी व्यक्त केले. तसेच मोदींच्या कामाचा वेग स्पीड ट्रेनसारखाच असल्याचे जपानचे पंतप्रधान अबे यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत अणुकराराविरोधात निदर्शने केली.

1 COMMENT

  1. मारुती मोटार campny ४९% जपानची भागीदारी होती. atta १००% मालकी आहे. बुलेट ट्रेन चा खर्च १० pat वाढवून ती रक्कम कर्ज म्हणून dakhavaychi नंतर karzachya वसुली साठी बुलेट ट्रेन चे मालक व्हायचे हे जपानचे सूत्र आहे. असली नरेंद्र मोदींना बंदी करून बहु राष्ट्रीय कंप न्यानी नकली नरेंद्र मोदी ला भारताचा पंत प्रधान बनविला आहे.त्याच्या मार्फत भारताची आर्थिक लुट करीत आहेत हे आमच्या दादाला कधी समजणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version