Home टॉप स्टोरी भारत-पाकिस्तानदरम्यानची चर्चा रद्द

भारत-पाकिस्तानदरम्यानची चर्चा रद्द

1

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानने चर्चेसाठी आमंत्रण दिल्याने भारताने पाकिस्तानसोबत सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली आहे.

नवी दिल्ली- काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानने चर्चेसाठी आमंत्रण दिल्याने भारताने पाकिस्तानसोबत सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली आहे.

येत्या २५ ऑगस्टला इस्लामाबाद येथे भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची बैठक होणार होती. मात्र फुटीरतावादी नेत्यांना आमंत्रण दिल्याने तसेच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून केल्या जाणा-या वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या धर्तीवर भारताने ही चर्चा रद्द केली आहे. सोमवारी पाकिस्तानचे उच्च आयुक्त अब्दुल बसित यांनी फुटीरतावादी नेते शब्बीर शहा यांची भेट घेतली.

काही दिवसांपूर्वीच लडाख दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून होणा-या कारवायांबद्दल निषेध व्यक्त केला होता. पाकिस्तानमध्ये समोरासमोर युद्ध करण्याची क्षमता नाही. पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध खेळत आहे, असा हल्लाबोल केला होता.

1 COMMENT

  1. मोदी सरकार चे हे फक्त ढोंग व नाटक आहे . भारतातून पाकिस्थानात गेलेला तथाकथित पत्रकार वैदिक हाफिज सैद शी चर्चा केलेली मोदी ला चालते . नवाझ शरीफ ने मोदी च्या आई ला दिलेली साडी चालते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version